FIFA World Cup 2018 : फिफा २०१८ या स्पर्धेसाठी आता केवळ एक दिवस शिल्लक असून फुटबॉलप्रेमी मोठ्या प्रमाणावर रशियात पोहोचत आहेत. तसेच सर्व संघदेखील रशियात पोहोचले असून स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सर्व जण जोरदार सराव करताना दिसत आहेत. गतविजेत्या जर्मनीबरोबरच ब्राझील, स्पेन, अर्जेटिना, फ्रान्स, उरुग्वे, बेल्जीयम हे संघ या स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध करू इच्छित आहेत. मात्र या सर्व गोष्टींचा तणाव न घेता ब्राझीलचा संघ मैदानात मस्ती करत असताना दिसून आला.

ब्राझीलचा संघ रशियात या स्पर्धेसाठी पोहोचला. त्यांनतर या स्पर्धेच्या सामन्यासाठी त्यांना ठराविक वेळ सराव करण्यासाठी देण्यात आला होता. मंगळवारी हा सराव करून झाल्यानंतर मात्र ब्राझीलच्या संघाने मैदानावर चांगलीच मस्ती केली. ब्राझीलचा फुटबॉलपटू फिलिप कोन्टिनो याचा त्या दिवशी २६वा वाढदिवस होता. त्यावेळी ब्राझीलचा आक्रमक फळीतील फुटबॉलपटू नेमारमध्ये लपलेल्या लहान मुलाचे दर्शन घडले. नेमारने वाढदिवसानिमित्त फिलिपच्या डोक्यावर चक्क अंडी फोडली आणि पीठाने त्याला पूर्ण पाने माखवून टाकले.

 

हा पहा व्हिडीओ –

हा सर्व प्रकार मैदानातच घडला. यावेळी नेमारने एकट्यानेच फिलिपच्या डोक्यावर अंडी फोडण्याचा आनंद लुटला नाही, तर सरावानंतर आसपास बसलेल्या सहकाऱ्यांनाही अंडी दिली आणि साऱ्यांनी मिळून हि अंडी फिलिपच्या डोक्यावर फोडली. या प्रकारानंतर फिलिप या सगळ्यांना मारण्यासाठी गत्यांच्या मागे धावत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसले.

Story img Loader