FIFA World Cup 2018 ARG vs FRA : फिफा विश्वचषक स्पर्धेत राउंड ऑफ १६ फेरीला सुरुवात झाली. बाद फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने अर्जेंटिनावर ४-३ने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पूर्वार्धात बरोबरी आणि उत्तरार्धाच्या सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या फ्रान्ससाठी कायलन एमबापे हा तारणहार ठरला.
उत्तरार्धात अर्जेंटिनाने आक्रमक पवित्रा स्वीकारत सामन्याच्या ४८व्या मिनिटाला गोल केला आणि आघाडी २-१ मिळवली. मर्क्याडोने अर्जेंटिनाला ही आघाडी मिळवून दिली होती. पण पवार्डने ५७व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर मात्र सामना बरोबरीत सुटणार का? असा प्रश्न फुटबॉलप्रेमींच्या मनात येईपर्यंतच १९ वर्षीय कायलन एमबापे ‘तुफानी’ खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याच्या या कामगिरीमुळे ब्राझीलचा महान खेळाडू पेले याच्या विक्रमाला त्याने टक्कर दिली. कायलिन एमबापे फिफा विश्वचषकाच्या एका सामन्यात दोन गोल करणारा पेलेनंतरचा सर्वात युवा खेळाडू ठरला.
कायलिन एमबापे ठरला फिफा विश्वचषकाच्या एका सामन्यात दोन गोल करणारा पेले यांच्यानंतरचा सर्वात युवा खेळाडू, एमबापेने अर्जेन्टिनाविरुद्ध डागले दोन गोल @LoksattaLive @PrathmeshDixit2 @kridajagat @MarathiBrain #Mbappé #FRA #FRAARG #worldcup
; VIJAY SHINDE (@vijaymajha) June 30, 2018
सामन्यात केवळ ४ मिनिटाच्या कालावधीत एमबापेने २ गोल केले. ६४व्या मिनिटाला त्याने गोल केला. या गोलमधून अर्जेंटिना सावरत असतानाच त्याने ६८व्या मिनिटाला दुसरा गोल केला. या दोन गोलमुळे फ्रान्सला भक्कम आघाडी मिळाली. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत अग्युरोने गोल करून अर्जेंटिनाला पुनरागमनाची आशा दाखवली. पण सामना संपेपर्यंत १ गोलची आघाडी फ्रान्सने कायम ठेवली आणि पुढील फेरीत प्रवेश केला.