FIFA World Cup 2018 AUS vs PER : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज क गटातील शेवटच्या लढतीत पेरूने ऑस्ट्रेलियावर २-० असा विजय मिळवला. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र पेरूच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ हतबल ठरला. पेरूकडून पूर्वार्धात १८व्या सामन्यात कॅरिल्लोने गोल केला. तर उत्तरार्धात ५०व्या मिनिटाला गुरेरोने गोल केला. या दोन गोलच्या जोरावर पेरूने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.
फ्रान्स आणि डेन्मार्क संघांमधला सामना गोलशून्य बरोबरीत, डेन्मार्कला बाद फेरीचं तिकीट, तर पेरुचा ऑस्ट्रेलियावर 2-0 असा विजय @LoksattaLive @kridajagat @PrathmeshDixit2 #worldcup #FRA #den
; VIJAY SHINDE (@vijaymajha) June 26, 2018
या सामन्याआधी पेरूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यातील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र पेरून विजय मिळवत गटात तिसऱ्या स्थानी राहत स्पर्धेचा शेवट गोड केला. फिफा विश्वचषकात पेरुचा ४० वर्षांनंतर हा पहिला विजय ठरला. पेरुने १९७८ साली इराणवर ४-१ असा विजय मिळवला होता.
फिफा विश्वचषकात पेरुचा 40 वर्षांनंतर पहिला विजय, पेरुनं 1978 साली इराणवर 4-1 असा मिळवलेला विजय @LoksattaLive @PrathmeshDixit2 @kridajagat #PER @peru #worldcup #FifaWorldCup18
; VIJAY SHINDE (@vijaymajha) June 26, 2018
दरम्यान, फ्रान्स आणि डेन्मार्कमध्ये झालेला सामना हा गोलशून्य बरोबरीत सुटला. मात्र आधीच्या २ सामन्यांत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे या दोनही संघांना बाद फेरीत स्थान मिळाले. फ्रान्सने गटात अव्वल स्थान पटकावले, तर डेन्मार्कने दुसऱ्या स्थानी राहत बाद फेरीतील स्थान निश्चित केले.
GROUP C.
All eyes now turn to Rostov-on-Don & Saint Petersburg for #NGARG & #ISLCRO. pic.twitter.com/YU8Ki5kkDV; FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 26, 2018
या दोघांचे सामने ड गटातील बाद फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या संघांशी होणार आहेत.