रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाची सुरुवात पोर्तुगालने मोठ्या धडाक्यात केली आहे. रोनाल्डोच्या हॅटट्रिकच्या जोरावर पोर्तुगालने पहिल्याच सामन्यात स्पेनला ३-३ असं बरोबरीत रोखलं. या सामन्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर रोनाल्डोच्या खेळाचं कौतुक होत आहे. मात्र सामना संपल्यानंतर घडलेल्या एका घटनेमुळे रोनाल्डो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

स्पेनविरुद्ध सामन्यादरम्यान एक लहानगा चाहता पोर्तुगालला पाठींबा देण्यासाठी मैदानात हजर होता. सामना संपल्यानंतर आपल्या लाडक्या रोनाल्डोला भेटण्यासाठी हा चाहता आपल्या आईसोबत संघ निघण्याच्या जागेवर वाट पाहत होता. मात्र पोर्तुगालची बस निघताना पाहिल्यावर या लहानग्या चाहत्याला रुडु कोसळलं. रोनाल्डोला हा प्रकार समजल्यानंतर त्याने बसमधून बाहेर पडून त्या रडणाऱ्या चाहत्याची भेट घेतली. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून रोनाल्डोने त्या चाहत्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या. या भेटीनंतर तो लहानगा चाहताही भारावरुन गेला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Story img Loader