Fifa World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धा कालपासून सुरु झाली आणि यजमान रशियाने सलामीचा सामना जिंकला. त्यांनी Fifa World Cup 2018च्या सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाचा ५-० असा दणदणीत पराभव केला. रशियाच्या युरी गाजिंस्कीने यंदाच्या विश्वचषकातील पहिला गोल केला. या गोलच्या मदतीने त्याने रशियाला सौदी अरेबियाविरोधात १-०ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४३ व्या मिनिटांला डेनिस चेरिशेवने, दुसरा राखीव खेळाडू एरटेम डेज्यूबाने ७१ व्या मिनिटाला आणि त्यानंतर खेळाच्या अखेरच्या काही क्षणांत रशियाने एकामागोमाग एक असे दोन गोल केले आणि सामना ५-० ने जिंकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात अनेक लक्षवेधी क्षण होते. मात्र त्यात साऱ्यात मैदानाबाहेर सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा एक क्षण ठरला. रशियाचे राष्ट्रधयक्ष व्लादिमिर पुतीन हे हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये बसले होते. त्यांच्याबरोबर ‘फिफा’चे अध्यक्ष आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र बसले होते. या दरम्यान, सामन्यात २८ वर्षीय युरी गाजिंस्कीने १२ व्या मिनिटाला गोल केला. हा स्पर्धेतील पहिला गोल ठरला. या गोलनंतर स्टेडिअममधील ८० हजार प्रेक्षकांनी जल्लोष केला. रशियाच्या खेळाडूंनी मैदानावर आपला आनंद व्यक्त केला. पण सर्वात महत्वाची ठरली ती पुतीन यांची प्रतिक्रिया.

 

 

हा गोल झाल्यावर पुतीन यांनाही नक्कीच आनंद झाला. हा आनंद फार मोठ्या प्रमाणावर त्यांना साजरा करता येणे शक्य नव्हते. पण त्यांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बीन सलमान अल सौद यांच्याकडे पाहत एक लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. ‘आपण इथे बसून काहीच करू एकत नाही’, अशा पद्धतीची ती प्रतिक्रिया होती. कॅमेरामननेही तो क्षण अचूक टिपला. त्यांची ही सोशल मीडियावर प्रचंड हिट झाली.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 russia president vladimir putin reaction to saudi arabia crown prince