अमेरिकेचे एम१ए१ अ‍ॅब्राम्स आणि एम१ए२ अ‍ॅब्राम्स हे आजमितीला जगातील सर्वोत्तम रणगाडे समजले जातात. इराकच्या तावडीतून १९९१ साली कुवेत मुक्त करण्यासाठी बहुराष्ट्रीय फौजांनी केलेल्या ‘ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ या कारवाईतील आणि त्यानंतर २००३ सालच्या ‘ऑपरेशन इराकी फ्रीडम’ या मोहिमेतील उत्तम कामगिरीमुळे ते जगाच्या नजरेत भरले. सद्दाम हुसेनच्या नावाजलेल्या रिपब्लिकन गार्डस या तुकडय़ांचा धुव्वा उडवण्यात अ‍ॅब्राम्सचा मोठा वाटा होता. रणगाडय़ांच्या १०० वर्षांच्या इतिहासात विकसित झालेल्या सर्वोच्च तंत्रज्ञानाचा यामध्ये संयोग आहे. व्हिएतनाम युद्धात १९६८ ते १९७२ या काळात अमेरिकी सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल क्रिग्टन अ‍ॅब्राम्स यांच्या गौरवार्थ या रणगाडय़ांना अ‍ॅब्राम्स हे नाव दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेने जुन्या एम-६० रणगाडय़ांना पर्याय म्हणून १९७०-१९८० च्या दशकांत अ‍ॅब्राम्स रणगाडे विकसित केले. त्यांची पहिली एम-१ ही आवृत्ती १९७८ साली तयार झाली. त्यानंतर १९८५ साली एम१ए१ आणि १९८६ साली एम१ए२ या आवृत्ती तयार झाल्या. मूळ अ‍ॅब्राम्स रणगाडे क्रायस्लर डिफेन्स या कंपनीने तयार केले होते. नंतर ही कंपनी जनरल डायनॅमिक्स लँड सिस्टिम्स डिव्हिजनने विकत घेतली.

अमेरिकेचे एक शिष्टमंडळ १९७३ साली ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ब्रिटनने त्या शिष्टमंडळाला त्यांनी चॅलेंजर रणगाडय़ासाठी विकसित केलेले चोभम नावाचे खास चिलखत दाखवले. अमेरिकेला ते पसंत पडले आणि अ‍ॅब्राम्स रणगाडय़ासाठी त्याचा स्वीकार केला. त्यावर अमेरिकेने स्वत:ची सुधारणा करून डिप्लिटेड युरेनियमचे अतिकठीण आवरण लावले. त्याने अ‍ॅब्राम्सला उत्तम संरक्षण प्रदान केले आहे.

अ‍ॅब्राम्सवर जर्मनीच्या ऱ्हाइनमेटल कंपनीने विकसित केलेली १२० मिमी व्यासाची स्मूथबोअर तोफ आहे. याशिवाय मशिनगनही आहेत. सिस्टिम एन्हान्समेंट प्रोग्रॅम अंतर्गत एम१ए१ अ‍ॅब्राम्सच्या फायर कंट्रोल, थर्मल व्ह्य़ुअर आदी डिजिटल यंत्रणांमध्ये सुधारणा करून एम१ए२ अ‍ॅब्राम्स साकारला आहे. त्याची सर्व यंत्रणा संगणकीकृत आहे. त्यात अद्ययावत संवेदक (सेन्सर्स) आदींचा वापर केला आहे. इराकमध्ये शहरी भागात आलेल्या लढाईच्या अनुभवानंतर २००६ साली त्यावर ‘टँक अर्बन सव्‍‌र्हायव्हल किट’ (टस्क) नावाची अतिरिक्त संरक्षक प्रणाली बसवली गेली. १५०० अश्वशक्तीचे गॅस टर्बाइन इंजिन ६३ टनांच्या अ‍ॅब्राम्सला ताशी ६७ किमीचा वेग प्रदान करते, मात्र ते डिझेल इंजिनच्या तुलनेत दुप्पट इंधन खर्च करते. अमेरिकेसह इजिप्त, सौदी अरेबिया, कुवेत, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या सैन्यात अ‍ॅब्राम्स रणगाडे वापरात आहेत.

sachin.diwan@ expressindia.com