सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com
अमेरिकेने १९८०च्या दशकात स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह (एसडीआय किंवा स्टार वॉर्स) कार्यक्रम सुरू केला. सोव्हिएत युनियनची अण्वस्त्रधारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. त्यात लेझर किरणांबरोबरच गतिज ऊर्जेवर आधारित शस्त्रे (कायनेटिक एनर्जी वेपन्स) विकसित करण्यावर भर होता.
मात्र त्यावेळी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे हजारो किलोमीटर अंतरावर एकमेकांवर आपटून शत्रूचे क्षेपणास्त्र पाडू शकतील इतकी अचूक नव्हती. शत्रूचे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी त्याच्या जवळ पुरेसा मोठा स्फोट करणे गरजेचे होते. क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रावर पारंपरिक स्फोटके वापरली असती तर हे साधणे शक्य नव्हते. त्यामुळे अमेरिकेने १९७० आणि १९८०च्या दशकांमध्ये सोव्हिएत क्षेपणास्त्रे अंतराळात पाडण्यासाठी प्रथम अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांच्या वापराचा विचार केला होता. त्या परिस्थितीत वातावरणात काही किलोमीटर उंचीवर अण्वस्त्रस्फोट होऊन त्याच्या किरणोत्साराचा विपरित परिणाम पृथ्वीवर झाला असता. तसेच अणुस्फोटात निर्माण होणाऱ्या विद्युतचुंबकीय धक्क्य़ामुळे (इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स) इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडली असती. या धोक्यांमुळे त्याला पर्याय शोधण्यास सुरुवात झाली.
त्यात गतिज ऊर्जेवर आधारित शस्त्रांचा पर्याय प्रामुख्याने पुढे आला. वास्तविक गतिज ऊर्जेवरील शस्त्रे ही संकल्पना नवी नव्हती. अगदी १९व्या शतकापर्यंत तोफांमधील गोळे भरीव धातूचे होते. त्यात स्फोटके भरलेली नसत. हे तोफगोळे केवळ त्यांच्या वेगावर विसंबून असत. त्यांचा माराही विनाशक असे. मात्र त्यांची अचूकता फारशी चांगली नसे. १९९०च्या दशकापर्यंत धातूचे गोळे किंवा बाणासारखी अणुकुचीदार सळई अंतराळात हजारो किलोमीटपर्यंत डागण्यासाठी आणि तिला दिशादर्शन करण्यासाठी लागणारे उच्च तंत्रज्ञान उपलब्ध झाले होते.
अशा शस्त्रांमध्ये वापरले जाणारे गोळे किंवा बाण टंगस्टनसारख्या कठीण धातूचे किंवा मिश्रधातूचे बनवले जातील. त्यांना हायपरसॉनिक वेगाने (ध्वनीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने) अंतराळात डागण्यासाठी ऊर्जेचा शक्तिशाली स्रोत असणे आवश्यक आहे. सामान्य तोफेत त्यासाठी गनपावडर किंवा अन्य पारंपरिक स्फोटके वापरली जातात. कायनेटिक एनर्जी वेपन्समध्ये त्यासाठी कॉम्पॅक्ट पल्स्ड पॉवर सोर्सचा वापर केला जाईल. त्यानंतर धातूचा गोळा किंवा बाण (प्रोजेक्टाइल) अंतराळात जाऊन शत्रूच्या क्षेपणास्त्रापर्यंत अचूक पोहोचण्यासाठी त्याला रडार, लेझर किंवा इन्फ्रारेड (अवरक्त) किरण, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) आदी साधनांची मदत घेतली जाईल. हे प्रोजेक्टाइल किंवा वॉरहेड जेव्हा शत्रूच्या क्षेपणास्त्रावर आघात करेल तेव्हा ते केवळ गतिज ऊर्जेचा (म्हणजे त्याच्या वेगाचा) वापर करेल. त्यात कोणतीही स्फोटके नसतील. त्या आघातानेच शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा त्यातील बॉम्ब नष्ट होतील. या यंत्रणेच्या उभारणीत अनेक अडचणीही आहेत. इतक्या वेगाने आणि इतक्या दूरवर अचूकपणे लक्ष्यभेद करणे म्हणजे बंदुकीच्या एका गोळीने दुसरी गोळी पाडण्याइतके आव्हानात्मक काम आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञान तितकेच प्रगत आणि बिनचूक असले पाहिजे. या शस्त्रांची परिमामकारकता वाढवण्यासाठी तोफगोळा किंवा वॉरहेडमध्ये ब्लास्ट फ्रॅगमेंटेशन तंत्र वापरले जाईल. त्यात धातूच्या गोळ्याचे किंवा सळईचे अनेक तुकडे होऊन ते विस्तृत प्रदेशात पसरून आघाताची शक्यता वाढते. अमेरिकेच्या पॅट्रियट क्षेपणास्त्रावर हे तंत्र वापरले आहे.