उत्तर व्हिएतनामच्या सैन्याच्या मदतीने दक्षिण व्हिएतनाममधील ‘व्हिएत काँग’ गनिमी योद्धय़ांनी १९६८ साली अनेक ठिकाणी अमेरिकी तळांवर मोठे हल्ले चढवले. व्हिएतनाम युद्धात ही कारवाई ‘टेट ऑफेन्सिव्ह’ म्हणून गाजली. त्यात गनिमी योद्धे आणि अमेरिकेचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. एकाच वेळी अनेक ठिकाणी झालेल्या या प्रखर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकेला व्हिएतनाममध्ये नुकत्याच दाखल झालेल्या ‘बेल एएच-१ कोब्रा’ या लढाऊ हेलिकॉप्टरची मोठय़ा प्रमाणात मदत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोरियन युद्ध आणि त्यानंतर व्हिएतनामच्या संघर्षांमधील सुरुवातीच्या दिवसांच्या अनुभवातून अमेरिकेला चांगल्या लढाऊ हेलिकॉप्टरची गरज जाणवू लागली होती. बेल यूएच-१ इरोक्वाय ह्य़ुई हेलिकॉप्टर प्रामुख्याने वाहतुकीसाठी तयार केली होती. त्यांच्यावर शस्त्रे बसवून माफक प्रमाणात हल्ल्यांसाठी वापर केला जात होता; पण ते पुरेसे नव्हते. वाहतूक हेलिकॉप्टरना संरक्षण देण्यासाठी सोबत लढाऊ हेलिकॉप्टर असणे गरजेचे होते. त्यातून बेल कंपनीने एएच-१ कोब्रा आणि नंतर सुपरकोब्रा या लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती केली. ‘एएच’ ही अक्षरे अ‍ॅटॅक हेलिकॉप्टरसाठी वापरली होती. अमेरिकेच्या बेल कंपनीने लढाऊ हेलिकॉप्टरच्या संकल्पनेवर १९५८ पासून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यात बदल आणि सुधारणा होऊन १९६७ साली बेल एएच-१ कोब्रा हेलिकॉप्टर १९६७ मध्ये अमेरिकी सेनादलांच्या ताफ्यात दाखल झाले. त्याचा कमाल वेग ताशी २७७ किमी आणि पल्ला ५७४ किमी होता. त्यावर २० मिमी व्यासाची कॅनन (तोफ), ७.६२ मिमी व्यासाच्या मशीनगन, ४० मिमी व्यासाचा ग्रेनेड लाँचर, ७० मिमी व्यासाची हायड्रा रॉकेट बसवता येत असत. यातील मिनिगन प्रकारच्या मशीनगन अनेक नळ्यांच्या गॅटलिंग गन प्रकारच्या होत्या आणि त्या एका मिनिटात हजारो गोळ्या झाडू शकत. शत्रूला जमिनीवरून हल्ला करताना सहजपणे नेम धरता येऊ नये यासाठी कोब्राची रुंदी बरीच कमी ठेवली आहे.

त्याची सुपरकोब्रा ही सुधारित आवृत्ती १९६९ साली वापरात आली. त्यावर मशीनगन आणि रॉकेटसह ‘टो’ (टीओडब्ल्यू – टय़ूब लाँच्ड, ऑप्टिकली ट्रॅक्ड, वायर गायडेड) आणि हेलफायर ही हवेतून जमिनीवर मारा करणारी तर साइडवाइंडर ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. सुपरकोब्रा ताशी ३५२ किमी वेगाने ५८७ किमी प्रवास करू शकते. ही हेलिकॉप्टर व्हिएतनामसह इराण-इराक युद्धात प्रामुख्याने जमिनीवरील सैन्य आणि रणगाडय़ांच्या विरोधात वापरात आली.  सुपरकोब्राची व्हायपर ही आवृत्ती आजही वापरात आहे.

sachin.diwan@expressindia.com