आधुनिक लढाऊ विमानांच्या विकासामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील लढाऊ विमानांच्या हवेतील लढती किंवा डॉगफाइट्स मागे पडल्या आहेत. त्यावेळी मशिनगन आणि कॅनन ही लढाऊ विमानांवरील मुख्य शस्त्रे होती आणि त्यांचा पल्ला मर्यादित असल्याने विमान शत्रूच्या विमानाच्या जवळ घेऊन जाणे भाग असे. मात्र पुढे हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित झाल्यानंतर या जुन्या पद्धतीच्या विमानांच्या डॉगफाइट्स मागे पडल्या. आता लढाऊ विमानांच्या हवेतील लढती दृश्यमानतेच्या सीमेच्या पलीकडील म्हणजे बियाँड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) बनल्या आहेत.

अमेरिकेचे एआयएम-९ साइडवाइंडर हे बरेच जुने, मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेच्या नौदलाने त्यांच्या विमानांसाठी १९५०च्या दशकात हे क्षेपणास्त्र विकसित केले. नंतर ते अमेरिकी हवाई दलानेही स्वीकारले. साइडवाइंडर क्षेपणास्त्र १९५६ साली अमेरिकी सेनादलांत सामील झाले आणि आजतागायत त्याच्या विविध सुधारित आवृत्ती कार्यरत आहेत. सुरुवातीला हे क्षेपणास्त्र फारसे प्रभावी नव्हते. मात्र नंतर त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. सध्या ते २७ देशांच्या सेनादलांत कार्यरत असून आजवर विविध युद्धे आणि संघर्षांत साइडवाइंडरनी एकूण २७० विमाने पाडली आहेत.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

साइडवाइंडर हे नाव वाळवंटातील एका विषारी सापाच्या नावावरून घेतले आहे. हा साप त्याच्या बाजूच्या दिशेने वळत प्रवास करतो. त्यामुळे त्याला साइडवाइंडर म्हणतात. साइडवाइंडर क्षेपणास्त्र ध्वनीच्या अडीचपट वेगाने प्रवास करत ३५ किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. त्याचे वजन साधारण ८५ किलो असून त्यावर ब्लास्ट फ्रॅगमेंटेशन प्रकारची स्फोटके बसवली आहेत. त्याला विमान किंवा हेलिकॉप्टरवरून डागता येते आणि ते शत्रूची विमाने किंवा हेलिकॉप्टर पाडू शकते.

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रसाराला सोव्हिएत युनियनच्या स्कड क्षेपणास्त्राने जसा हातभार लावला तशीच भूमिका साइडवाइंडरने हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रसारात निभावली. चीन आणि तैवान यांच्यात १९५८ साली संघर्ष उसळला होता. त्यात तैवानकडे अमेरिकी एफ-८६ सेबर आणि चीनकडे सोव्हिएत मिग-१७ विमाने होती. त्या संघर्षांत एकदा तैवानी सेबरने चीनच्या मिगवर अमेरिकेने पुरवलेले साइडवाइंडर क्षेपणास्त्र डागले. मात्र क्षेपणास्त्राचा स्फोट न होता ते मिगवर तसेच रुतून राहिले. त्यासह मिग तळावर व्यवस्थित परतले. चीनच्या ताब्यातील साइडवाइंडर सोव्हिएत युनियनने हस्तगत केले आणि त्याची नक्कल करून (रिव्हर्स इंजिनीअरिंग) व्हिम्पेल के-१३ नावाचे क्षेपणास्त्र तयार केले. त्याला नाटो संघटनेने एए-२ अटॉल असे नाव दिले. त्यावरून सोव्हिएत युनियनने पुढील हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली.

साइडवाइंडरवरून जर्मनीने आयरिस-टी, ब्रिटनने फायरस्ट्रीक, फ्रान्सने मॅजिक, इस्रायलने पायथॉन, ब्राझिलने पिरान्हा ही क्षेपणास्त्रे विकसित केली. अमेरिकेने त्यापुढील एआयएम-७ स्पॅरो हे क्षेपणास्त्र तयार केले. ते हवेतून हवेत ७० किमीपर्यंत मारा करू शकते. अमेरिकेने १९७०च्या दशकात एआयएम-५४ फिनिक्स हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तयार केले. त्याचा पल्ला १९० किमी आहे. अमेरिकेचे एआयएम-१२० अ‍ॅमराम (अ‍ॅडव्हान्स्ड मिडियम रेंज एअर टू एअर मिसाइल) हे हवेतून हवेत मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते ध्वनीच्या चौपट वेगाने १८० किमीपर्यंत मारा करू शकते.