पहिल्या महायुद्धापर्यंत (१९१४-१९१८) मशिनगन आणि तोफखान्याचा मारा इतका प्रखर झाला होता की मोकळ्या मैदानात सैन्याच्या कारवाया करणे अशक्य झाले होते. त्यापासून बचाव करण्यासाठी आघाडीवर खंदक खणून मोर्चेबंदी केली जाऊ लागली. जमिनीला काहीशा समांतर मारा करणाऱ्या फिल्ड गन्स त्याविरुद्ध फारशा प्रभावी ठरत नसत. खंदकांमध्ये मारा करण्यासाठी वक्राकार मार्गाने गोळे डागणाऱ्या हॉवित्झर आणि मॉर्टर अधिक प्रभावी ठरत. मग अशा अधिकाधिक क्षमतेच्या तोफा बनवण्याकडे कल वाढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रिटिशांना आफ्रिकेतील बोअर युद्धात या पद्धतीच्या लढाईचा थोडा अनुभव मिळाला होता. त्याचा वापर करून त्यांनी रॉयल गॅरिसन आर्टिलरीसाठी अनेक अवजड तोफा विकसित केल्या. त्यात १९०४ साली वापरात आलेली ६० पौंडांचे गोळे डागणारी हॉवित्झर तोफ सर्वाधिक गाजली. या तोफेचे वजन साडेचार टन होते. ही तोफ १२७ मिमी (५ इंच) व्यासाचा गोळा ९४१८ मीटर अंतरावर डागू शकत असे. युद्धकाळात तिच्याच सुधारणा होऊन तिचा पल्ला ११,२४७ मीटपर्यंत वाढला. ही तोफ दुसऱ्या महायुद्धापर्यंत वापरात होती.

यासह ब्रिटिश ६ इंची हॉवित्झरही मोठय़ा प्रमाणात वापरात होती. तिची सुरुवातीची आवृत्ती ५३.७५ किलो (११८.५ पौंड) वजनाचा गोळा ३५ अंशांच्या कोनातून ४७५५ मीटपर्यंत डागू शकत असे. युद्धकाळात त्यात सुधारणा केल्यानंतर ही तोफ ४५ अंशांच्या कोनातून १०,४२४ मीटर अंतरांपर्यंत मारा करू लागली. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी अशा ३६०० तोफा वापरल्या. त्यातून एकूण २२ दशलक्षहून अधिक तोफगोळे डागले.

ब्रिटिश ९.२ इंची हॉवित्झरचे वजन १५.५ टन होते. तिची मार्क १ ही आवृत्ती १९१४ साली वापरात आली आणि ती १३१.५ किलो (२९० पौंडांचा) गोळा ९१९० मीटर अंतरावर डागू शकत असे. ही तोफ डागताना जागेवरून हलू नये म्हणून तिला ८ टनांची मातीने भरलेली मोठी पिशवी (काऊंटरवेट) लावावी लागत असे. या तोफेची मार्क २ ही आवृत्ती १२,७४२ मीटपर्यंत मारा करू शकत असे. तिला स्थिर राखण्यासाठी १० टनांची मातीची पिशवी बांधावी लागत असे. १९१४ ते १९१८ या काळात ब्रिटिशांनी अशा ४५० तोफा तयार करून वापरल्या. याशिवाय ब्रिटिशांनी १९१६ मध्ये १२ इंच व्यासाची अजस्त्र हॉवित्झर वापरात आणली. तिच्या मार्क १,३ आणि ४ अशा आवृत्ती होत्या. ही तोफ ३४० किलोचा गोळा १३ किलोमीटपर्यंत डागू शकत असे.

पहिल्या महायुद्धावेळी अमेरिकेची लष्करी तयारी फारशी नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने ब्रिटिश आणि फ्रेंच तोफा वापरल्या. त्यात ब्रिटिश १८ पौंडी, फ्रेंच ७५ मिमी, फ्रेंच १५५ मिमी जीपीएफ, १५५ मिमी श्नायडर, २४० मिमी हॉवित्झर, ८ आणि ९.२ इंची हॉवित्झर तोफांचा समावेश होता.

ऑस्ट्रियाकडे स्कोडा वर्क्‍सने तयार केलेल्या अनेक तोफा होत्या. त्यात स्कोडा ३०५ मिमी मॉडेल १९११ ही तोफ विशेष उल्लेखनीय होती. ही तोफ ३८४ किलोचा गोळा ९६०० मीटपर्यंत किंवा २८७ किलोचा गोळा ११,३०० मीटपर्यंत डागत असे. असे एका मिनिटात १० गोळे डागले जात. त्यांच्या माऱ्याने ३९३ मीटरमधील मालमत्तेचे पूर्ण नुकसान होत असे आणि तेथे ८.२ मीटर खोल खड्डा पडत असे. रशियाने १९०५ सालच्या युद्धात जपानकडून झालेल्या पराभवातून शिकून  सुधारित श्नायडर १२० मिमी हॉवित्झर, प्युतिलोव्ह ७६.२ मिमी एम ०२ तोफा वापरल्या.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com