भारतीय हवाईदलातील मिग-२१ लढाऊ विमानांच्या सतत होणाऱ्या अपघातांमुळे आता त्याची ‘उडती शवपेटी’ (फ्लाइंग कफिन) म्हणून संभावना केली जात असली तरी या विमानाने एक काळ गाजवला आहे. मिकोयान आणि गुरेविच या डिझायनर्सची उत्तम निर्मिती असलेले हे लढाऊ विमान सोव्हिएत युनियनच्या हवाई दलात १९५९ साली सामील झाले. तेव्हापासून १९८०च्या दशकापर्यंत भारतासह साधारण ६० देशांच्या हवाईदलांची मुख्य भिस्त या विमानावर राहिली आहे. या काळात १० हजारांहून अधिक मिग-२१ विमानांनी जगभर सेवा बजावली असून शत्रूच्या उरात धडकी भरवली आहे. अरब-इस्रायल युद्धे आणि व्हिएतनाम युद्धात मिग-२१ चा प्रताप जगाने पाहिला आहे. आधुनिक काळात त्यांचे महत्त्व थोडे कमी झाले असले तरी भारतासह काही देशांच्या हवाईदलात अद्याप मिग-२१ कार्यरत आहेत. भारतीय हवाईदलातील लढाऊ वैमानिकांच्या दोन ते तीन पिढय़ा या विमानावर घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिग-२१च्या रचनेमागची भूमिका अमेरिकेच्या अगदी विरोधातील आहे. अमेरिकी एफ-४ फँटम या विमानात तंत्रज्ञानावर खूप भर होता. इतका की त्यावरील क्षेपणास्त्रांमुळे शत्रूची विमाने त्याच्या आसपास फिरकू शकणार नाहीत असे गृहीत धरून त्यावर जवळच्या लढाईसाठी मशिनगन किंवा कॅनन बसवल्या नव्हत्या. व्हिएतनामच्या आसमंतातील लढायांत मिग-२१ नी अमेरिकेची ही मस्ती उतरवली. सुधारित फँटमवर कॅनन बसवावी लागली.

याउलट मिग-२१ची रचना साधी, सोपी, सुटसुटीत, पण प्रभावी आणि मोठय़ा प्रमाणात किफायतशीर उत्पादनास योग्य अशी होती.  मिग-२१चे ७५०० किलो थ्रस्ट उत्पन्न करणारे तुमान्स्की टबरेजेट इंजिन त्याला ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट (ताशी २२३० किमी) वेग प्रदान करत असे. सिगारच्या आकाराचे फ्यूजलेज, त्रिकोणी आकाराचे पंख (डेल्टा विंग्ज) आणि त्यासह स्टॅबिलायझर ही रचनेतील वैशिष्टय़े त्याच्या वायुगतिकीय कामगिरीत भर टाकत होती. एका मिनिटाला १७,६८० मीटरच्या वेगाने ते अधिकतम १८,००० मीटर (५९,०५० फूट) उंची गाठत असे. त्यावर दोन कॅनन, १५०० किलो बॉम्ब, रॉकेट्स आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे अशी माफक पण प्रभावी शस्त्रे होती.

मिग-२१ ची मुख्य उणीव म्हणजे त्याचा मर्यादित पल्ला (११६० किमी) आणि हवेत राहण्याची कमी क्षमता (एन्डय़ुरन्स). मिग-२१ केवळ ३० ते ४५ मिनिटेच हवेत राहू शकत असे. त्यामुळे मिग-२१चे तळ बहुतांशी सीमेजवळ असत. मात्र नंतर त्यावर इंधनाच्या अधिक टाक्या बसवण्याची सोय करून ही त्रुटी भरून काढण्यात आली. त्याच्या ‘हँडलिंग कॅरॅक्टरिस्टिक्स’ उत्तम होत्या; पण चूक झाल्यास ते विमान क्षमाशील नव्हते (इट वॉज अ नॉन-फॉर्गिव्हिंग एअरक्राफ्ट), असे मिग-२१ बद्दल भारतीय हवाईदलातील एक निवृत्त वरिष्ठ अधिकारी म्हणाले होते.

सचिन दिवाण
sachin.diwan@ expressindia.com