विमानांमध्ये इंधन भरण्याच्या क्षमतेवरील मर्यादेमुळे त्यांच्या पल्ल्यालाही मर्यादा येते. त्यातही बॉम्बफेकी विमानांचा पल्ला थोडा अधिक असतो. मात्र लढाऊ (फायटर-इंटरसेप्टर) विमानांची इंधन वाहून नेण्याची क्षमता त्या तुलनेत कमी असते. त्याचे एक कारण असे की, लढाऊ विमानांच्या कामाचे स्वरूप वेगळे आहे. त्यांना हवाई युद्धात चपळाईने हालचाली करण्याची गरज असते आणि त्यासाठी त्यांचा आकार लहान आणि आटोपशीर असणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्यात मर्यादित प्रमाणात इंधन मावते. यावर उपाय म्हणून लढाऊ विमानांमध्ये हवेत उड्डाणादरम्यान इंधन भरणारी विमाने विकसित करण्यात आली. त्याने लढाऊ विमानांचा कारवाईचा पल्ला आणखी वाढला. अशा प्रकारे हवेत इंधन भरण्याला मिड एअर किंवा एरियल री-फ्युएलिंग म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उडत्या विमानात इंधन भरण्याचे प्रयत्न १९२० च्या दशकापासून होत होते; पण त्या वेळचे विमानांचे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असल्याने या प्रयत्नांना फारसे यश येत नव्हते. ब्रिटिश तंत्रज्ञ सर अ‍ॅलन कोभम यांनी १९३०-४० च्या दशकात ग्रॅपल्ड-लाइन नावाची हवेत विमानातून विमानात इंधन भरण्याची पद्धत विकसित केली. मात्र अशा प्रकारे उडत्या विमानात इंधन भरणे खूपच जिकिरीचे होते. त्यातून अधिक सुधारित प्रोब अँड ड्रोग पद्धत आकारास आली. त्यामध्ये इंधन घेऊन जाणारे मोठे विमान (टँकर) हवाई पेट्रोल पंपासारखे काम करते. ज्यामध्ये इंधन भरायचे ते लढाऊ विमान (रिसिव्हर) टँकरच्या मागे जवळ येते. दोन्ही विमानांच्या वेग आणि अंतराचा समन्वय साधून टँकरमधून होज-पाइप बाहेर सोडला जातो. त्याला हवेत स्थिर करण्यासाठी नरसाळ्याच्या (फनेल) आकाराचे ड्रोग बसवलेले असते. त्याचे टोक रिसिव्हर विमानावरील नळीच्या आकाराच्या प्रोब किंवा बूमला मिळते. त्यानंतर व्हॉल्व उघडून टँकरमधून रिसिव्हर विमानात इंधन भरले जाते.

हवेत इंधन भरण्याची फ्लाइंग बूम नावाची पद्धतही अस्तित्वात आहे. त्यात टँकर विमानातून लांबीला विस्तारणाऱ्या दुर्बिणीच्या रचनेप्रमाणे टेलिस्किोपिक बूम बाहेर येतो. त्याने रिसिव्हर विमानात इंधन भरले जाते. या दोन्ही पद्धतींचे काही फायदे-तोटे आहेत. प्रोब अँड ड्रोग पद्धतीत वापरलेली नळी लवचीक असते. त्यामुळे ती विमाने, हेलिकॉप्टर आदींमध्ये वापरास सोयीस्कर आहे. मात्र त्यातून इंधन वाहण्याचा वेग कमी असतो. याउलट फ्लाइंग बूम कठीण असतो आणि त्याच्या वापरासाठी खास यंत्रणेची गरज असते; पण त्यातून इंधन वेगाने भरता येते.

अमेरिकेची केसी-१०, केसी-१३५, रशियाची इल्युशिन आयएल-७८ आदी मिड एअर रिफ्युएलिंग विमाने आहेत. त्यांनी लढाऊ विमानांचा पल्ला वाढवण्यात बरीच मदत केली आहे. त्याचा परिणाम व्हिएतनाम, फॉकलंड, इराक, बोस्निया आदी संघर्षांत दिसून आला.

sachin.diwan@expressindia.com