जर्मन ब्लिट्झक्रिगने पोलंड आणि फ्रान्स हिटलरच्या पंखाखाली आले असले तरी फ्रान्समधील आरा येथील लढाईत ब्रिटिशांनी पाठवलेल्या ‘माटिल्डा’ आणि फ्रान्सच्या ‘चार बी-१’ रणगाडय़ांनी जर्मन पँझर-३ आणि पँझर-४ रणगाडय़ांना चांगलेच जेरीस आणले होते. पँझर हे त्या काळातील उत्तम रणगाडय़ांपैकी एक असले तरी त्यांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी निर्माण होऊ लागले होते. हिटलरने पूर्वेकडे रशियावर आक्रमण करून दुसरी आघाडी उघडली होती. तेथेही सुरुवातीला पँझरच्या जोरावर नाझी फौजांनी जोरदार मुसंडी मारली असली तरी रशियाच्या ‘टी-३४’ रणगाडय़ांच्या रूपात पँझरपुढे तगडा प्रतिस्पर्धी उभा राहिला होता. त्यामुळे  दुसऱ्या महायुद्धाच्या मध्यात पँझर-३ आणि पँझर-४ रणगाडय़ांत सुधारणा करण्याची गरज भासू लागली होती. हिटलरने १९४१ सालात आणखी अवजड आणि प्रभावी रणगाडे तयार करण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यानंतर पँझर रणागाडय़ांत सुधारणा करून पँझर-५ पँथर आणि पँझर-६ टायगर हे नवे दोन रणगाडे १९४२-४३ सालांत तयार करण्यात आले. पँथर रणगाडय़ाचे चिलखत ८० मिमी जाडीचे होते. त्याचे पुढील आवरण ३५ अंशांच्या कोनात तिरपे केलेले (स्लोप्ड आर्मर) होते. त्यामुळे चिलखताची जाडी आणखी वाढते आणि शत्रूचे तोफगोळे रणगाडय़ावर धडकून बाजूला जाण्याची शक्यता वाढते. त्यावर ७.५ सेंमी व्यासाची शक्तिशाली तोफ होती. ४६ टन वजनाचा हा रणगाडा ताशी ५० किमीच्या आसपास वेगाने प्रवास करू शकत असे.

टायगर-१ या रणगाडय़ाचे चिलखत १०० मिमी जाडीचे होते आणि त्यावर ८.८ सेंमी व्यासाची मुख्य तोफ होती. त्याशिवाय दोन ते तीन मशिनगन बसवण्याची सोय होती. टायगर रणगाडय़ाची दमदार तोफ दोन किलोमीटर अंतरावरून शत्रूच्या रणगाडय़ाचे ११० मिमी जाडीचे चिलखत भेदू शकत असे. टायगर-२ किंवा किंग टायगर ही त्याची सुधारित आवृत्ती ८.८ सेंमी व्यासाच्या तोफेने २ किमीवरून १३२ मिमी जाडीचे चिलखत भेदू शकत असे. हे रणगाडे त्या काळातील सर्वात दमदार रणगाडे होते आणि कोणत्याही देशाच्या कोणत्याही रणगाडय़ाच्या चिंधडय़ा उडवण्यास समर्थ होते. मात्र या प्रयत्नांत त्यांचे वजन खूप वाढले होते. टायगर-१चे वजन ५६ टन तर टायगर-२चे वजन ६८ टन इतके होते. त्यामुळे त्यांचा वेग कमी होता आणि त्यांच्या निर्मितीतील गुंतागुंतीमुळे दुरुस्ती अवघड होती.

sachin.diwan@ expressindia.com