जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून दुसऱ्या महायुद्धाची सांगता करणारे विमान म्हणून अमेरिकेचे बोईंग बी-२९ सुपरफोट्र्रेस हे बॉम्बर ओळखले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्टेंबर १९४२ मध्ये या विमानाने प्रथम उड्डाण केले तेव्हा ते जगातील सर्वात आधुनिक बॉम्बर विमान होते. पल्ला, वेग, बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधा या सर्व बाबतीत त्याने अन्य विमानांना मागे टाकले. त्याचा वेग ताशी साधारण ५६० किमी इतका आणि पल्ला ६४०० किमी (४००० मैल) इतका होता. ते एक उत्तम हाय अल्टिटय़ूड, लाँग रेंज बॉम्बर (अतिउंचावरून लांब पल्ल्यावर बॉम्बफेक करणारे विमान) होते. त्याची हवेत ९६०० मीटर किंवा ३१,८०० फूट उंचीवर काम करण्याची क्षमता होती. इतक्या उंचीवरील थंड वातावरणात कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्याच्या केबिनमध्ये हवेचा दाब आणि उष्णता नियंत्रित करण्याची सोय होती. त्याच्या शेपटाकडील एक मशीनगन वगळता इतर सर्व मशीनगन रिमोट कंट्रोलने चालवता येत असत. अचूक बॉम्बफेकीसाठी त्यावर रिमोट कन्ट्रोल्ड, कॉम्प्युटराइज्ड साइट्सची व्यवस्था होती. मात्र त्यात एक त्रुटी होती. त्यांचे इंजिन पेट घेऊन बंद पडण्याचा धोका असे.

अमरिकेने १९४४ साली जपानवर बी-२९च्या मदतीने जोरदार बॉम्बवर्षांव सुरू केला. त्यासाठी सुरुवातीला भारत आणि चीनमधील तळ वापरले होते. बंगाल आणि पूर्व भारतातील खरगपूर, कलाईकुंड, चाकुलिया, दूधकुंडी आणि पियारदोबा या ठिकाणच्या धावपट्टय़ांवरून बी-२९ विमाने उड्डाण करून जपान आणि जपानच्या ताब्यातील प्रदेशावर बॉम्बफेक करत. त्याला ‘ऑपरेशन मॅटरहॉर्न’ असे नाव होते. नंतर प्रशांत महासागरातील मरिआना बेटे अमेरिकेने जिंकून घेतली आणि तेथून जपानवर हल्ले केले जाऊ लागले. ९ मार्च १९४५ रोजी २७९ बी-२९ विमानांनी जपानवर तुफान बॉम्बवर्षांव करून टोकियो शहराचा एकचतुर्थाश भाग नष्ट केला. या एका रात्रीच्या हल्ल्यात ८०,००० जपानी नागरिक मरण पावले.

प्रशांत महासागरातील मरिआना द्वीपसमूहातील तिनियन बेटावरून ६ ऑगस्ट १९४५ रोजी पहाटे कर्नन पॉल टिबेट्स यांच्या नेतृत्वाखालील बी-२९ विमानाने ‘लिटल बॉय’ या अणुबॉम्बसह हिरोशिमाच्या रोखाने उड्डाण केले. टिबेट्स यांनी त्यांच्या आईचे लग्नापूर्वीचे नाव – एनोला गे – त्यांच्या विमानावर लिहिले होते. या विमानातून हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला गेला. त्यानंतर ९ ऑगस्टला ‘बॉक्स कार’ (इू‘’२ उं१) नावाच्या बी-२९ विमानातून नागासाकीवर ‘फॅट मॅन’ नावाचा अणुबॉम्ब टाकला गेला. बी-२९ बॉम्बर विमानाने जगाला अणुयुगात आणून सोडले.

sachin.diwan@ expressindia.com