पहिल्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात रिव्हॉल्व्हरची जागा ऑटोमॅटिक पिस्तुले घेत होती. तसेच रायफलची जागा सब-मशिनगननी घेण्यास सुरुवात केली होती. या काळात रायफलचा साधारण पल्ला ८०० ते १२०० मीटरच्या जवळपास होता. पण पहिल्या महायुद्धानंतर १९३० च्या दशकात जर्मनीने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की प्रत्यक्षात चकमकी इतक्या लांबच्या अंतरावर घडत नाहीत त्या फारफार तर ४०० मीटरच्या अंतरात घडतात. त्यामुळे बंदुकांचा इतका लांबचा पल्ला अनावश्यक वाटू लागला. तसेच शत्रूवर अतिंम टप्प्यात निकराचा हल्ला करताना (असॉल्ट) बोल्ट-अॅक्शन रायफलइतक्या अचूकतेचीही गरज भासत नाही. त्यावेळी नेम अचूक नसला तरी चालतो पण शत्रूवर गोळ्यांचा जोरात वर्षांव करण्याची गरज भासते. तसेच पारंपरिक मशिनगन एकटय़ा सैनाकाने उचलून नेण्याइतक्या हलक्या नसत. या गरजेतून सब-मशिनगन आणि असॉल्ट रायफलचा उदय झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा