सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्युबातील १९६२ सालचे क्षेपणास्त्र संकट प्रत्यक्ष युद्धाचा भडका न उडता निवळले असले तरी महासत्तांची शस्त्रस्पर्धा थांबली नव्हती. सोव्हिएत युनियनने त्या काळात क्षेपणास्त्र विकासात काहीशी आघाडी घेतली होती.

सोव्हिएत युनियनने आर-७ रॉकेटच्या मदतीने पहिले दीर्घ पल्ल्याचे किंवा आंतरखंडीय क्षेपणास्त्र (आयसीबीएम) विकसित करण्याचा प्रयत्न केला. रशियन संशोधकांमध्ये हे क्षेपणास्त्र सेम्योर्का म्हणून प्रसिद्ध होते, तर नाटो संघटनेने त्याचे सांकेतिक नाव एसएस-६ सॅपवूड असे ठेवले होते. त्याच्या संरचनेला एप्रिल १९५३ मध्ये अनौपचारिक मान्यता मिळाली, तर मे १९५४ मध्ये सोव्हिएत मंत्रालयांनी त्याच्या विकासाला अधिकृत परवानगी दिली. ऑगस्ट १९५७ मध्ये बैकानूर येथून त्याची पहिली चाचणी घेण्यात आली. ती फारशी यशस्वी झाली नाही. त्यानंतर क्षेपणास्त्रात सुधारणा करून ऑक्टोबर १९५७ मध्ये ते कार्यान्वित झाले. सॅपवूड क्षेपणास्त्राचा पल्ला ६००० मैल होता आणि त्यावर ३ ते ५ मेगाटन क्षमतेची अण्वस्त्रे बसवता येत होती. आता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक शहरे सोव्हिएत माऱ्याच्या टप्प्यात आली होती. याच अग्निबाणाचा वापर करून सोव्हिएत युनियनने १९५७ साली स्पुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला.

मात्र सॅपवूड पूर्णपणे खात्रीशीर क्षेपणास्त्र होऊ शकले नाही. त्याचे क्रायोजेनिक इंधन अस्थिर होते आणि ते भरण्यास २४ तास लागत असत. तसेच ते जमिनीखालील बंकरमधून (सिलो) प्रक्षेपित करता येत नसे. ही क्षेपणास्त्रे १९६४ ते १९६८ दरम्यान सेवेतून मुक्त करण्यात आली.

त्यानंतर सोव्हिएत युनियनने आर-१६ किंवा एसएस-७ सॅडलर हे क्षेपणास्त्र विकसित केले. नोव्हेंबर १९६१ मध्ये ते सोव्हिएत सेनादलात दाखल झाले. सॅडलरचा पल्ला ७००० ते ८१०० मैल होता आणि त्यावर ५ ते ६ मेगाटन क्षमतेची अण्वस्त्रे बसवता येत असत. ते अधिक विश्वासार्ह आणि खऱ्या अर्थाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र होते. ही क्षेपणास्त्रे सोव्हिएत युनियनने मोठय़ा प्रमाणावर तैनात केली. १९६५ पर्यंत १८६ सॅडलर क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या रोखाने तैनात झाली होती. आता जवळपास सर्व अमेरिका सोव्हिएत क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आली होती. सॅडलर क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान २४ ऑक्टोबर १९६० रोजी झालेल्या स्फोटात ७५ हून अधिक शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांचा मृत्यू झाला. त्यात चीफ मार्शल ऑफ आर्टिलरी मित्रोफान नेदेलीन यांचाही समावेश होता.

सॅपवूड आणि सॅडलर क्षेपणास्त्रांच्या विकासानंतर सोव्हिएत युनियनने क्षेपणास्त्र स्पर्धेत आघाडी घेतली. त्याने अमेरिकी सेनादले आणि नेत्यांची झोप उडवली. त्यानंतर अमेरिकेनेही आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकासावर भर दिला. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधील १९७२ सालच्या स्ट्रॅटेजिक आम्र्स लिमिटेशन ट्रीटी (सॉल्ट) नुसार सोव्हिएत युनियनने १९७६ पर्यंत सॅडलर क्षेपणास्त्रे सेवेतून निवृत्त केली.