सतराव्या-अठराव्या शतकात एकाच डेकवर तोफा बसवलेल्या वेगवान युद्धनौकांना फ्रिगेट म्हटले जात असे. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत (१८५० च्या दरम्यान) तसे म्हणणे बंद झाले, कारण त्यावेळी सर्वच प्रकारच्या नव्या युद्धनौका तशाच प्रकारे बांधल्या जाऊ लागल्या. त्यात ग्लुअ, वॉरियर आदी नौकांचा समावेश होता. त्यातून फ्रिगेटची कामे करणाऱ्या नव्या प्रकारच्या नौकांचा उदय झाला. मुख्य ताफ्याच्या पुढे जाऊन टेहळणी करणे (स्काऊटिंग अँड फ्लिट रेकोनेसन्स), आपल्या देशाच्या व्यापारी जहाजांचे रक्षण करणे शत्रूच्या व्यापारी जहाजांवर धाडी टाकणे (कॉमर्स प्रोटेक्शन अँड रेडिंग) अशी या नव्या नौकांची प्रमुख कामे होती. त्या शक्यतो मुख्य युद्धनौकांपेक्षा (बॅटलशिप) आकाराने लहान असत. प्रत्येक वेळी तसे असेलच असे नाही. मात्र या नौका खूप वेगवान असत. त्यामुळे त्यांना क्रुझर असे नाव मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा