सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com
अण्वस्त्रे ही प्रत्यक्षात वापरली जाण्याची शक्यता कमी असली, तरी शत्रूला धाक दाखवण्यासाठी (डिटेरन्स) त्यांचा प्रभावीपणे वापर करता येणे शक्य होते. त्यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत युनियनपाठोपाठ ब्रिटन, फ्रान्स, चीन या देशांनीही अण्वस्त्रे विकसित केली. त्यातून जगाची नवी सत्तासंरचना उदयास आली. अमेरिका, सोव्हिएत युनियन, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन ही पाच अण्वस्त्रधारी राष्ट्रे जगात सर्वशक्तिमान बनली. संपूर्ण जग अण्वस्त्रधारी आणि अण्वस्त्रे नसलेल्या देशांत विभागले गेले. अण्वस्त्रांनी शीतयुद्ध अत्यंत घातक पातळीवर नऊन ठेवले.
सुरुवातीची अण्वस्त्रे अगदी प्राथमिक रचना असलेली किंवा कामचलाऊ स्वरूपाची होती. ती फारशी कार्यक्षमही नव्हती. नंतर कमी आण्विक इंधन वापरून अधिक क्षमतेचा स्फोट करण्यावर भर देण्यात आला. म्हणजेच अण्वस्त्रांची कार्यक्षमता वाढत गेली. त्यासाठी लागणारे शुद्ध युरेनियम, प्लुटोनियम आणि अन्य सामग्री विकसित करणे हे तांत्रिकदृष्टय़ा कठीण काम होते. या तंत्रज्ञानावर बरीच वर्षे पाच बडय़ा देशांची मक्तेदारी होती. हेच पाच देश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्य आहेत. ते आपल्या कंपूत (न्यूक्लिअर क्लब) अन्य देशांचा शिरकाव होऊ देत नसत.
मात्र अण्वस्त्रांचा प्रभावच असा होता की, ती अनेक देशांना मोठय़ा शत्रूच्या तुलनेत लष्करी दरी भरून काढणारी किंवा बरोबरी साधून देणारी शस्त्रे (इक्वलायझर) वाटत. त्यातून विभागीय किंवा प्रादेशिक शक्ती बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या देशांनी अण्वस्त्रे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात भारत, पाकिस्तान, इस्रायल, इराक, इराण, उत्तर कोरिया, लिबिया आदी देशांचा समावेश आहे. यातील अनेक देशांनी प्रथम संशोधन, शांततामय वापरासाठी किंवा वीजनिर्मितीसाठी अणुतंत्रज्ञान मिळवले. एखाद्या बडय़ा अण्वस्त्रधारी देशाशी संधान बांधून अणुभट्टय़ा मिळवल्या. त्यातून प्रक्रिया होणारे युरेनियम किंवा प्लुटोनियम छुप्या मार्गाने अण्वस्त्रे तयार करण्यासाठी वापरले.
वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीबरोबरच अणुतंत्रज्ञानही विकसित होत होते. युरेनियम शुद्धीकरणासाठी नव्या पद्धती विकसित होत होत्या. गॅस सेंट्रिफ्यूज, फास्ट ब्रीडर रिअॅक्टर आदी तंत्रज्ञानाचा विकसित देशांकडून विकसनशील देशांमध्ये प्रसार होत असतानाच जाणते-अजाणतेपणी अण्वस्त्रप्रसारही होत होता.
लिबिया, पाकिस्तान, उत्तर कोरिया अशा देशांनी अणुतंत्रज्ञान चोरटय़ा मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून अण्वस्त्रांवर सुरुवातीला केवळ पाच देशांची असलेली मक्तेदारी संपली. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नवस्वतंत्र देशांत अण्वस्त्रे पसरली. तेथून ती दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचीही भीती निर्माण झाली.
मोठय़ा प्रमाणावर विध्वंसक अण्वस्त्रांबरोबरच (स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स) कमी संहारक आणि लहान आकाराची अण्वस्त्रेही (टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स) तयार करण्यात आली. ती मर्यादित युद्धात, डावपेचात्मक पातळीवर वापरली जाण्याची शक्यता अधिक होती. ती तोफा, विमाने, क्षेपणास्त्रे यावरून डागता येतात. त्यासह एकाच क्षेपणास्त्रावर तीन ते दहा अण्वस्त्रे बसवून ती वेगवेगळ्या लक्ष्यांवर डागण्याची सोय केली गेली. त्याला मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एन्ट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) किंवा मनुव्हरेबल रि-एंट्री व्हेईकल (एमएआरव्ही) म्हणतात. त्यासाठी लहान आकाराची अण्वस्त्रे (मिनिएचराइज्ड न्यूक्लिअर वॉरहेड्स) तयार करण्यात आली. या अण्वस्त्रप्रसारातून मानवाला पृथ्वीचा अनेक वेळा विनाश करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.