काल म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील घराघरामध्ये गणरायाचे आगमन झाले. भक्तिभावाने आणि उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी आरती आणि भजनांचा आवाज घुमू लागला. अशातच मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्येही बाप्पाचे आगमन झाले. मुंबई पोलिसांनी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘पोलीस बाप्पाचे’ स्वागत केले.

पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर राजेंद्र काणे यांनी सांगितले की ‘पोलीस बाप्पा’ आणण्यामागचा हेतू लोकांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुन्हेगारी, वाहतूक नियम आणि विशेषत: सायबर फसवणुकीबाबत माहिती नसलेल्या लोकांना जागरुक करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी स्वतः एक गाणेही तयार केले असून या गाण्याचे शीर्षक ‘पोलीस बाप्पा’ असे आहे.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sankarshan Karhade Political Poem video viral
छत्रपती शिवाजी महाराजांकडे गृहखातं, तर तुकोबा अर्थमंत्री…; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कवितेतून पांडुरंगाला साद, व्हिडीओ व्हायरल
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
aishwarya narkar shares diwali padwa video
नारकर जोडप्याचा दिवाळी पाडवा! अविनाश यांनी बायकोला काय गिफ्ट दिलं? ऐश्वर्या व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
raj kapoor prepare dimple kapadia look in bobby
‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”
navra maza navsacha 2
Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

सायबर गुन्हे आणि फसवणुकीबाबत लोकांना जागृत करणारे गाणे मुंबई पोलिसांकडून रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडीओ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. नागरिकांनी वेळीच सावध व्हावे आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे कसे रक्षण करावे यासंबंधी माहिती या गाण्यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एअर होस्टेसने फ्लाईटमध्ये ‘असं’ केलं गोंडस बाळाचं स्वागत; हा Viral Video जिंकेल तुमचं मन

पोलीस इन्स्पेक्टर काणे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले हे गाणे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि गायक अवधूत गुप्ते यांनी गायले आहे. तसेच या गाण्यामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्री, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, चिन्मयी सुर्वे, जयवंत वाडकर, माधव देवचके आणि हृषिकेश जोशी यांनी अभिनय केला आहे.