Ganesh Chaturthi 2022 Planet Condition: गणेश चतुर्थीचा सण देशात, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक हा सण गणेशाची जयंती म्हणून साजरा करतात. गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला सुरू होतो. ज्याची समाप्ती चतुर्दशीच्या दिवशी होते. यावेळी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला आहे. या दहा दिवसांत गणपतीची विधिवत पूजा केली जाते. त्यांच्या पूजेने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते. याशिवाय कुंडलीतील काही ग्रह शांत होऊन शुभ फल प्रदान करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार मुख्यतः बुध आणि केतू हे दोन ग्रह गणेश उपासनेचे शुभ फल देतात. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी नियमानुसार गणेशजींची पूजा करावी. यामुळे कुंडलीत बुध आणि केतू हे ग्रह शांत आहेत.

( हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2022: घरच्या घरी बनवा परफेक्ट मोदक; फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स)

बुध ग्रह

ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो. हे मिथुन आणि कन्या राशीचे शासक ग्रह आहेत. कन्या ही बुधाची उच्च राशी मानली जाते आणि मीन ही बुधाची नीच राशी मानली जाते. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, गणित, लेखन, मनोरंजन, वाद, प्रकाशन, व्यवसाय, मित्र, घसा, नाक इत्यादींचा कारक ग्रह मानण्यात येतो. त्यांच्या कुंडलीत शुभ असल्यामुळे बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात वाढ होते.

केतू ग्रह

ज्योतिषशास्त्रात केतूला पाप ग्रहाच्या श्रेणीत ठेवले आहे. त्याला छाया ग्रह असेही म्हणतात. तो तर्क, बुद्धिमत्ता, ज्ञान, अलिप्तता, कल्पनाशक्ती आणि मानसिक गुणांचा कारक ग्रह मानला जातो. केतू ग्रह लोकांना चौकटीबाहेर काम करण्यास भाग पाडतो.

( हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2022: गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहावी? जाणून घ्या यामागचे कारण)

गणेश पूजनाचे फायदे

गणेशाची पूजा केल्याने बुध ग्रहाशी संबंधित समस्या दूर होतात . त्याचबरोबर केतूची अशुभताही दूर होण्यास मदत होते.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By worshiping ganesha on ganesh chaturthi these planets become peaceful gps
Show comments