Common Ganpati Aarti Mistakes to Avoid : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व जण आतूर झालो आहोत. बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कोणी सुंदर मखर तयार करत आहे तर कोणी गोड गोड मोदक. गणरायाचे आगमन होताच घराघरांतून आरतीचा आवाज ऐकू येतो. तसे जवळपास सर्वांनाच आरती पाठ असते, पण तरीही आरती म्हणताना अनेक जण चुका करतात. अनेकदा आरती म्हणताना आपण काही शब्दांचा उच्चार चुकतो. अनेक जण बिनधास्त बाप्पासमोरही चुकीची आरती म्हणून मोकळे होतात. यंदा आरती म्हणताना या चुका टाळा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप्पाची आरती म्हणताना या चुका करू नका

नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची! कृपा जयाची

रत्नखचित करा नव्हे! रत्नखचित फरा

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

संकष्टी पावावे नव्हे! संकटी पावावे

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ओटी शेंदुराची नव्हे! उटी शेंदुराची

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वक्रतुंड त्रिनेमा नव्हे! वक्रतुंडत्रिनयना

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दास रामाचा वाट पाहे सजणा नव्हे! दास रामाचा वाट पाहे सदना

फळीवर वंदना नव्हे! फणिवरबंधना

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हेही वाचा – १०० वर्षांनी गणेश चतुर्थीला निर्माण होईल अद्भुत योग, बाप्पाच्या कृपेने ‘हे’ लोक होऊ शकतात कोट्याधीश, आनंदाचे दिवस येणार

गणपती आरती

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पितांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

गणेश आरती (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हेही वाचा – ‘शिखंडी!’ पुण्यात उभारले पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक, तुम्ही ऐकले का त्यांचे वादन, Viral Video एकदा पाहाच

इतर आरती म्हणताना होणाऱ्या चुका

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लवलवती विक्राळा नव्हे! लवथवती विक्राळा

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कायेन वाचा मच्छिन्द्र देवा नव्हे! कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दीपकजोशी नमोस्तुते नव्हे! दीपज्योती नमोस्तुते

बाप्पाची आरती म्हणताना या चूका टाळा (सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ओवाळू आरत्या सुरवंटया येती नव्हे! ओवाळू आरत्या कुरवंड्या येती.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common mistakes to avoid during ganesh aarti at home snk