गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी उत्साहात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. नोकरी आणि शिक्षणासाठी गाव सोडून शहरात आलेल नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची पावले गौरी-गणपतीनिमित्त आपो-आप गावाकडे वळतात. गणरायाचे ७ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन झाले त्याआधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाली. रेल्वेतर्फे कोकणात जादा गाड्या देखील सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान दादर येथे रेल्वे स्थानकावर गणपतीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या ज्यादा गाडीच्या स्वागतासाठी मुंबईतील कलारंग ग्रुपने शक्ती तूरा लोककला सादर केली. गावी जाणाऱ्या चाकरमान्याची त्यांनी करमणूक केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील शक्तीतुरा लोककला

गणोशोत्सवादरम्यान तुम्हाला कोकणातील घराघरातून जाखडी नृत्याचा आवाज कानावर पडतो ज्याला कोकणात शक्ती तुरा असे देखील म्हटलं जातं. आज ही कला संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाली आहे. शक्ती तूरा ही कोकणातील पारंपरिक कला आहे. शक्ती म्हणजे पार्वती आणि तुरा म्हणजे महादेव. या दोघांतील संवाद म्हणजे शक्ती तूरा. वडिलोपार्जित जाखडी नृत्याची ही कला कोकणातील तरुण मंडळी जोपासत आहे. चिपळून आणि गुहागार या ठिकाणी शक्ती तूरा ही कला पाहायला मिळते. कोकणात जितके महत्त्व गणपतीला आहे. शंकर आणि पार्वतीचा महिमा सांगणार्‍या ‘शक्ती तूरा’ या लोककलेला देखील तितकंच महत्त्व आहे.

हेही वाचा – Video : मद्यधुंद रिक्षाचालकांचा भररस्त्यात राडा! तरुणीच्या गाडीला दिली धडक, वाहतूक पोलिसाच्या मारली कानाखाली

व्हायरल व्हिडीओमध्ये ही ‘शक्ती तूरा’ लोककला मुंबईतील कलारंग ग्रुपने दादर स्टेशनवर सादर केली आणि रेल्वेस्टेशनवरील प्रवाशांचे मनोरंजन केले. व्हिडीओमध्ये पाहून शकता की, पारंपारिक वेषभूषेमध्ये काही तरुणी पारंपारिक वेषभूषेमध्ये नृत्य करताना दिसत आहे तर मधोमध तबला आणि ढोलकी वाजवणारे वादक बसलेले दिसत आहे. सर्व प्रवाशांनी ही नृत्य पाहण्यासाठी गर्दी केली आहे. काही लोक मोबाइलमध्ये व्हिडिओ शुट करताना दिसत आहेत. आपल्या कोकणातील लोककला पाहून गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत आहे.

हेही वाचा – “काँग्रेस नेत्यांकडे काळा पैसा आहे” असा दावा करणारा मल्लिकार्जुन खरगे यांचा Viral Video खोटा, जाणून घ्या काय आहे सत्य?

इंस्टाग्रामवर aapla_amol आणि kokani_aatma या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “कोकणकर ज्या ठिकाणी जातो तिथे स्वर्ग बनवतो”

दुसरा म्हणाला की, आम्ही कोकणकर तेव्हाच प्रसिद्ध झालो जेव्हा कोकणी म्हणून जन्माला आलो.

तिसरा म्हणाला,”येवा कोकण आपलाच असा..”

चौथा म्हणाला, “कोकणची संस्कृती, येवा कोकण आपलोच असा”

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Culture of konkan artists perform shakti tura folk art at dadar railway station watch viral video snk