Viral Video : सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. जिकडे तिकडे गणपतीची तयारी सुरू आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण गणेशोत्सवामध्ये रमलेला दिसत आहे. पुणे ज्या प्रमाणे गणेशोत्सवासाठी लोकप्रिय आहे तसे मुंबई सुद्धा गणेशोत्सवासाठी ओळखले जाते. मुंबईचा गणेशोत्सव बघण्यासाठी दुरवरून लोक येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत अनेक गणपती व गणपतीचे मंडळे आहेत, जे खूप लोकप्रिय आहे. लालबागचा राजा असो किंवा चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा असो किंवा जीएसबी गणपती, गिरगावचा गणपती असो किंवा तेजुकाया मेन्शन गणपती इत्यादी गणपती बघायला लोक खूप गर्दी करतात. सोशल मीडियावर मुंबईतील गणपतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लालबागच्या राजाचे जुने फोटो दाखवले आहे. १९३४ पासून ते २०२४ पर्यंतचे संपूर्ण फोटो यामध्ये दाखवले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लालबागचा राजाच्या १९३४ पासून ते २०२४ पर्यंतच्या सर्व मूर्तींचा प्रवास खूपच अद्वितीय आहे. दरवर्षी या मूर्तींच्या रचना आणि आकार बदलत गेले.

हेही वाचा : Pune Video : पिंपरी चिंचवडपासून २० किमीवर डोंगरावर स्थित असलेले देवीचे हे सुंदर मंदिर पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला १९३४ पासून ते २०२४ पर्यंत लालबागच्या राजाचे प्रत्येक वर्षीचा लूक दिसेल. लालबागचा राजाचे दरवर्षीचे रूप कसे होते, हे तुम्हाला या व्हिडीओमधून दिसेल. हे खूप दुर्मिळ फोटो आहेत, जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

S R L या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लालबागचा राजा, मुंबई १९३४ पासून २०२४ पर्यंत संपूर्ण चित्र दर्शन. अद्भुत !”

हेही वाचा : बाईsss .. हा काय प्रकार! पुराच्या पाण्यात अडकलेलं जोडपं कारच्या छतावर बसलं होतं गप्पा मारत; काका काकूंचा Video Viral

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेशमूर्ती सर्वत्र ओळखली जाते. तेथे दर्शनासाठी देशभरातून लाखो लोक येतात. या लालबागच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते, त्याच ठिकाणी ती साकारली जाते. मूर्ती साकारण्यापूर्वी त्या ठिकाणी विधिवत पूजा केली जाते, असे म्हणतात. १९३१ रोजी पेरू चाळीतील बाजारपेठ बंद पडली होती,त्यावेळी तेथील स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाली तर गणपती बसवू, असा नवस केला आणि त्याप्रमाणे १९३४ साली लालबाग बाजारपेठेत गणपती बसविण्यास सुरुवात झाली.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you see all idols of lalbaugcha raja ganpati from 1934 to 2024 video goes viral on social media ndj