पुणे : गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली असून, सर्व प्रकारच्या फुलांचे दर तेजीत आहेत.गौरी विसर्जनानंतर फुलांच्या मागणीत घट झाली आहे. पुणे जिल्ह्यात गेले तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने फुलांची आवक कमी झाली आहे. फुलांचे दर तेजीत असल्याची माहिती मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात विविध फुलांचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू- २० ते ५० रुपये, गुलछडी- २०० ते ३५० रुपये, बिजली- ५० ते ८० रुपये, कापरी- ३० ते ७० रुपये, अष्टर (चार गड्डीचे दर)- १६ ते २० रुपये, सुट्टा- ८० ते १०० रुपये, शेवंती- ३० ते ५० रुपये, डच गुलाब (२० नग)- ५० ते १०० रुपये, जरबेरा- ३० ते ४० रुपये, कार्नेशन- ८० ते १२० रुपये, ऑर्किड- ३०० ते ४०० रुपये