बुलढाणा: लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळ आणि घराण्यांनी आजही आदर व भक्तिभावाने जोपासला आहे. साखरखेर्डा ( ता. सिंदखेडराजा) येथील एका कुटुंबानेही पिढ्यान पिढ्या हा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जोपासला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीराम मंदिर परिसरातील कमीअधिक १३७ वर्षांचा इतिहास असलेला माधव भुवन मधील मानाचा गणपती प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या काळी गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली त्याच काळात या गणेशाची स्थापना करण्यात आली. या बाप्पाने शतकाचा आकडा ओलांडला आहे. गंगाधर माधव देशपांडे यांच्या हातून टिळकांच्या काळात गणरायाची स्थापना झाली. पुढे जगन्नाथ गंगाधर देशपांडे , रामश्चंद्र देशपांडे यांनी कायम ठेवली आहे. रामचंद्र देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या अर्धांगिनी पुष्पलता देशपांडे मनोभावे गणरायाला पुजत आहेत. गणरायाला मानणारी ही तिसरी पिढी आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous lord ganesha in madhav bhuvan which has a history of 137 years in shri ram temple area scm 61 amy
Show comments