Ganesh Chaturthi Shubh Mantras: आज गणेश चतुर्थीच्या निमित्त जगभरात गणरायाच्या भक्तांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमननाने सारी सृष्टी आनंदी झाली आहे. दोन वर्षानंतर गणेशाचे आगमन झाल्याने यंदाचा गणेशभक्तांचा उत्साह खरोखर पाहण्यासारखा आहे. गणेशोत्सवात आरती, पूजा विधी यांना विशेष मान आहे. पूजेच्या दरम्यान बाप्पाचे आवडते मंत्रोच्चार करणे अत्यंत शुभ मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी खाली दिलेल्या या मंत्राचा २१ वेळा जप केल्यास बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते. आपल्याला २१ वेळा शक्य नसेल तर निदान एकदा तरी या मंत्रांचा जप आवर्जून करा.
गणपतीचे मंत्र सोपे असले तरी अनेकदा उच्चारांमध्ये गल्लत होऊ शकते. असे झाल्यास विनाकारण अर्थाचा अनर्थ होतो, हेच टाळण्यासाठी खाली दिलेले हे मंत्र नीट वाचून लक्षात घ्या. (Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र)
1)
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
2)
ओम गं गणपतये नम
3)
गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:।
नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक :।।
धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:।
गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम।।
4)
त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय।
नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।
5)
ॐ नमो सिद्धि विनायकाय सर्व कार्य कर्त्रे सर्व विघ्न प्रशमनाय
सर्व राज्य वश्यकरणाय सर्वजन सर्वस्त्री पुरुष आकर्षणाय श्रीं ॐ स्वाहा ॥
आपल्या घरी सुद्धा बाप्पाचे आगमन झाले असेल. गणेशोत्सवाची धम्माल व बाप्पाचे गोंडस फोटो लोकसत्तासह शेअर करायला विसरू नका.