Ganesh Aarti Mistakes: आरतीच्या वेळी होणारी धम्माल ही प्रत्येक गणेशोत्सवाची शान असते. कितीही म्हणा पण मधूनच कडवं विसरणारी मंडळी, फक्त जय देव जय देवला आवाज वाढवणारी पोरं या साऱ्यांमुळे बाप्पाच्या आरतीला ट्विस्ट येतो हे नक्की. घाई गडबडीत कोणत्या आरत्या म्हणायच्या हे ठरवायचं राहून गेलं की मग बाप्पासमोर आरती घ्यायला उभं राहिलं की चांगलीच पंचाईत होते. मग एकाला एक शब्द जोडून, चुकीचे उच्चार करत आरती केली.. उरकली जाते! कुठे सुखकर्ता ऐवजी सुखहर्ता म्हणणारे, फणीवर वंदना ऐवजी वंदनाला फळीवर बसवणारे अनेकजण तुमच्याही आजूबाजूला असतील. अशा मंडळींना आजचा लेख खूप कामी येणार आहे. (Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चला तर मग गणपतीच्या आरत्यांमध्ये होणाऱ्या उच्चारांच्या चुका जाणून घेऊयात, जेणेकरून आरतीच्या वेळी सर्वांसमोर फजिती होणार नाही. ( हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2022: गणपतीत बिनधास्त खा उकडीचे मोदक; ‘या’ समस्यांवर आहे रामबाण उपाय)

गणपतीच्या आरती मधील उच्चारांचा चुका..

चुकीचा उच्चार

  • सुखहर्ता दुःखहर्ता
  • लंबोदर पितांबर फणीवर वंदना
  • संकष्टी पावावे, निरमा निरक्षावें
  • दास रामाचा वाट पाहे सजणा
  • दर्शन म्हात्रे मन
  • दीपकजोशी नमोस्तुते

योग्य उच्चार

  • सुखकर्ता दुःखहर्ता
  • लंबोदर पितांबर फणीवर वंदना
  • संकटी पावावे निर्वाणी रक्षावे
  • दास रामाचा वाट पाहे सदना
  • दर्शनमात्रे मन कामनापूर्ती
  • दीपक ज्योती नमोस्तुते

गणपतीची संपूर्ण आरती

Ganesh Chaturthi 2022: गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहावी? जाणून घ्या यामागचे कारण

घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. गणपतीच्या मखरांची आरास कशी करावी? फुलांची सजावट करताना कलर कोणते निवडावेत? आगमन- विसर्जनाला कोणते कपडे, कोणता नैवेद्य सर्व गोष्टींची काळजी आपण घेत असालच हो, ना? यंदा लोकसत्तासह तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो व गणेशोत्सवातील धम्माल किस्से शेअर करायला विसरू नका.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2022 full ganpati aarti in marathi with meaning try avoiding these word mistakes svs