Ganesh Chaturthi 2022: गणरायाचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. गणेश चतुर्थी निमित्त अनेक देशांमध्ये श्रद्धने गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवाचा सोहळा विधिवत साजरा करून विसर्जनापर्यंत सर्वकाही अगदी पद्धतशीर साजरे केले जाते. काही देशांमध्ये मूळचे भारतीय असणारे नागरिक गणेशोत्सव साजरा करतात तर काही ठिकाणी परदेशी नागरिक सुद्धा बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन सणांचा आनंद लुटतात. अशाच एका देशाने बाप्पावरील श्रद्धेपोटी चक्क आपल्या देशाच्या चलनावर गणरायाला स्थान दिले आहे. विशेष म्हणजे या देशातील तब्ब्ल ८७.५ टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मिय आहे.
गणपतीला शिक्षण, कला आणि विज्ञान याचा देव मानतात, हा ६४ कलांचा अधिपती विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. याच भावनेतून इंडोनेशियाच्या चलनावर बाप्पाचे चित्र छापलेले आहे. विशेष म्हणजे इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्येचे देश आहे येथील केवळ तीन टक्के लोकसंख्या हिंदूधार्मिय आहे.
इंडोनेशियाच्या नोटांवर झळकले बाप्पा
इंडोनेशियात २०हजाराच्या नोटेवर समोर गणपतीचा फोटो आहे आणि मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. त्यात शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. या नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. देवांत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नायक आहेत.
काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना तत्कालीन सरकारने २० हजार रुपयांची नोट छापली व त्यावर गणपतीचा फोटो होता काही काळाने देशाची आर्थिक व्यव्यस्था सुधारली तेव्हा हे सर्व गणपतीच्या आशीर्वादाने शक्य झाले अशी लोकांची मान्यता होऊ लागली परिणामी गणपतीच्या प्रतिमेची नोट अजूनही वापरली जाते.
बॉलिवूड चित्रपट निर्माता तनुज गर्ग यांनी इंडोनेशियातील या बाप्पाच्या नोटेचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. इंडोनेशियात भारतीय रुपया हेच चलन असले तरी, किंमत वेगवेगळी आहे.
पहा बाप्पाचे चित्र असणारी नोट
इंडोनेशियाचा काही भाग एकेकाळी चोल राजवटीच्या अधिपत्याखाली होता तेव्हा तेथे अनेक मंदिरे बांधण्यात आली होती. इंडोनेशियन लोकांना महाभारत आणि रामायण माहीत आहे. जकार्ता चौकात रथावर स्वार झालेला अर्जुन-कृष्ण व सोबत घटोत्कचाची सुद्धा मूर्ती आहे. इंडोनेशियात लष्कराचा मॅस्काॅट हनुमान आहे.
योगायोगाने, इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांचे नाव महाभारतातील कर्णाच्या नावावरून ठेवण्यात आले होते. त्यांची मुलगी मेगावती सुकर्णोपुत्री, तिचे नाव ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांनी ठेवले. मेगावती म्हणजे संस्कृतमध्ये ‘मेघ देवी’. एकूणच इंडोनेशियात भारतीय व मूळ हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवून देणारे अनेक पैलू पाहायला मिळतात पण त्यातही बाप्पाचे चित्र असणारी ही नोट अत्यंत खास आहे.