प्राण्यांच्या भावना समजून घेणं सोपं नसतं. माणूस बोलून किंवा हावभावातूनच बरंच काही व्यक्त करतो मात्र प्राण्यांसाठी हे सोपं नसतं. देशभरात सध्या सारेज जण गणपतीच्या स्वागतात रमले आहेत. कुणी गणपतीसाठी मोदकाच्या तयारीला लागले आहेत तर कुणी गणपतीच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान आता एका हत्तीचा अत्यंत खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये चक्क हत्तीनं बाप्पाचं स्वागत केलंय. बाप्पाच्या गळ्यात हार घालून गजराजनं बाप्पाचं आपल्या हटके स्टाईलने स्वागत केलंय.

तुम्ही कधी कुठल्या प्राण्याला देवाची पुजा करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गणेशभक्त हत्तीचा आहे. सध्या सारेज गणेशभक्त बाप्पाच्या सेवेत रमले आहेत आणि यातला हत्तीदेखील असाच एक भक्त आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठी मिरवणूक सुरू आहे. यावेळी सारेच जण गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यात तल्लीन होऊन थिरकताना दिसत आहेत. त्याचवेळी एक हत्ती आपल्या सोंडेत फुलांनी सजवलेला हार पकडून गणपती बाप्पा जवळ येताना दिसतो. लोकांच्या गराड्यात तो गणपतीसमोर उभा राहतो आणि आपल्या सोंडेने गणपतीच्या गळ्यात हार घालताना दिसतोय. हत्ती म्हणजे गणरायाचं रूप मानलं जातं. त्यामुळे चक्क हत्ती गणरायाला हार घालतानाचा हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथे लोकांनी एकच गर्दी केली होती.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच

आणखी वाचा : अ‍ॅमेझॉनचे शेकडो पॅकेज रेल्वे प्लॅटफॉर्मवर फेकून देऊ लागले, हा VIRAL VIDEO एकदा पाहा!

या व्हिडीओमध्ये हत्ती हळूहळू आपल्या सोंडेच्या मदतीने गणपतीच्या गळ्यात फुलांचा हार घातल्यानंतर पुढचं दृश्य आणखीनच थक्क करणारं होतं. गणपतीच्या गळ्यात हार घातल्यानंतर हत्ती आपली सोंड वर करून गणपतीला नमन करताना दिसून आला. हे दृश्य खरोखरंच खूपच भावनिक होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या बैलाने चांगलंच तुडवलं, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष जितू पटवारी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे, हे अद्याप कळू शकलं नाही. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. लोक मोठ्या श्रद्धेने या व्हिडीओला पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २ लाख ४८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत

Story img Loader