Ganesh Chaturthi 2022 Sand Art: गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर ३, ४२५ वाळूच्या लाडूतुन गणेशाचे वाळू शिल्प साकारले आहे. सुदर्शन यांनी वाळूचे लाडू वापरून दोन हत्तींसह बाप्पांचा चेहरा तयार केला आहे. देशभरात गणेश चतुर्थीचा सोहळा आज ३१ ऑगस्टरोजी मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना या अनोख्या गणेश मूर्तीचे फोट शेअर करून पटनायक देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुदर्शन यांनी साकारलेली गणरायाची वाळूची मूर्ती तब्बल ६ फूट उंच आहे, ज्यात दोन हत्ती साकारलेले आहेत. गणपती आणि हत्तीचे फार घनिष्ठ संबंध आहेत. जेव्हा भगवान शंकराने अजाणतेपणी गणेशचआ शिरच्छेद केला होता तेव्हा त्यांनी हत्तीच्या मुंडक्याने गणरायाला पुन्हा जिवंत केले होते, त्यामुळे बाप्पाच्या चेहऱ्याची रचना ही गजराजांसारखी साकारली जाते. सुदर्शन यांनी हि वाळूची मूर्ती शेअर करताना हे दोन हत्ती आपल्या पर्यावरणासाठी प्रार्थना करत आहेत असे कॅप्शन दिले आहे.

(Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र)

सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प कलेत दोन वेळा जगज्जेते पद पटकावले आहे तर भारत सरकारने त्यांना पद्म पुरस्काराणे सन्मानीत केले आहे. सुदर्शन नेहमीच आपल्या कलाकृतींद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. जनजागृतीसाठी तयार केलेल्या त्याच्या वाळूच्या कलेचे UN पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक आरोग्य संघटनेने अनेक प्रसंगी कौतुक केले. त्यांनी आजवर जगभरातील ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव आणि चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे आणि देशासाठी अनेक बक्षिसे जिंकली आहेत.

गणपती बाप्पाची वाळूची मूर्ती

आपल्या घरच्या बाप्पाचे सुद्धा आता आगमन झाले असेल. गणेशोत्सवाची धम्माल व बाप्पाचे गोंडस फोटो लोकसत्तासह शेअर करायला विसरू नका.