Ganesh Chaturthi History and Significance : सर्वांचाच आवडता सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. काही दिवसांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. यासाठीची तयारी आता शेवटच्या टप्प्यावर असून बाजारामध्ये यासाठीची लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही गणपती बाप्पाचे भक्त असाल तर यावर्षी तुम्ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेऊ शकता. ही ठिकाणं कोणती आहेत ते जाणून घेऊया.

मुंबईतील सर्वात उल्लेखनीय आणि सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. भगवान गणेशाला समर्पित हे मंदिर दादरच्या प्रभादेवी परिसरात आहे. असा दावा केला जातो की येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. या मंदिरात वर्षाचे बारा महिने गर्दी असली तरी मंगळवारी येथील गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. सिद्धिविनायक मंदिरात प्रख्यात राजकारणी आणि ख्यातनाम व्यक्ती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वारंवार येतात.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे</strong>

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यात आहे. येथील गणेशोत्सवासाठी हे मंदिर ओळखले जाते. पुण्यातील पाच मनाच्या गणपतींमध्ये या गणपतीचा समावेश होतो. येथील गणेश मूर्तीला जवळपास आठ किलोचे दागिने घालण्यात येतात. हे सर्व दागिने भक्तांकडून देण्यात आले आहेत. हे मंदिर दीर्घ आणि समृद्ध भूतकाळाचे साक्षीदार आहे. गणेश उत्सवादरम्यान, हे मंदिर भव्य रोषणाईने सजवले जाते.

  • अष्टविनायक मंदिर

महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये ओझरमधील विघ्नेश्वर मंदिर, महाडमधील वरदविनायक मंदिर, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर, रांजणगाव येथील महागणपती मंदिर, जुन्नर येथील लेण्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेले गिरिजात्मक मंदिर, थेऊर येथील चिंतामणी मंदिर, पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर आणि मोरगाव येथील मोरेश्वर मंदिरचा समावेश होतो. येथे दरवर्षी हजारो भक्त दर्शन घेण्यासाठी पोहचतात.

Photos : गणेशोत्सवाआधीच मुंबईकरांची लगबग, पाहा बाप्पांच्या खास मूर्ती…

  • कसबापेठ, पुणे

कसबा गणपती मंदिर हे पुणे येथे स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे.

रत्नागिरीमध्ये पावस येथील गणपतीपुळे मंदिरही अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या मंदिराला सुंदर निसर्गसौंदर्य लाभले आहे.

Story img Loader