भारतातील जवळपास सर्व हिंदू घरांत अधिष्ठान असणारा गणपती हा सर्वात लोकप्रिय देव आहे. कार्यारंभी गणपतीचे केले जाणारे पूजन, त्याला पंचायतनात मिळालेले स्थान आणि त्याचा असणारा गाणपत्य पंथ यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये त्याला महत्त्वपूर्ण देवता मानले गेले. हिंदू धर्माबरोबरच त्याला बौद्ध आणि जैन धर्मातही महत्त्वाचे स्थान मिळाले. भारत वगळता विद्यमान नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार, चीन, जपान, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बोíनओ इत्यादी देशांमध्येदेखील गणेशमूर्ती सापडल्या आहेत. अशा या लोकप्रिय देवतेचा इतिहास आणि मूर्तीचा उगम शोधण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांनी आजवर केला.

भारतातील प्राचीन साहित्य म्हणजे ऋग्वेद. या ऋग्वेदामध्ये बृहस्पती अथवा ब्रह्मणस्पती याचे वर्णन आहे, परंतु ते गजमुख गणेशाचे वर्णन नाही. इतकेच नाही तर ऋग्वेदामध्ये इंद्राला ‘गणपती’ म्हटले आहे. अथर्ववेदात येणाऱ्या पापमोचनसुक्तामध्ये ८५ देवतांचा उल्लेख आहे. त्यात ब्रह्मणस्पती आहे, परंतु गणेश किंवा गणपती यांचा उल्लेख नाही. यावरून वैदिक वाङ्मयामध्ये गणपती हे गणांचा अधिपती या अर्थाचे विशेषण म्हणून येते, हे स्पष्ट आहे. गणेश हे नाव वैदिक वाङ्मयामध्ये कुठेही आढळत नाही, हेही या निमित्ताने समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके

यानंतर प्रसिद्ध झालेले नाव म्हणजे विनायक. हे नाव ‘मानव गृसूत्र’ या ग्रंथात येते. यात वर्णन केल्याप्रमाणे एकूण चार विनायक आहेत: शालकंटक, देवयजन, उस्मित आणि कुष्माण्डराजपुत्र. यातही गणेश हे नाव येत नाही. तसेच विनायक गजमुख आहे, असेही वर्णन येत नाही. हे चारही विनायक लोकांच्या कार्यात विघ्न आणायचे. याच सूत्रात या विनायकांची शांती कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या/तिसऱ्या शतकातील बौधायन गृह्य़ परिशेष कल्प या ग्रंथात चार विनायकाच्या एकत्रीकरणातून एकच एक विनायक तयार होतो व त्याला हस्तिमुख म्हटलेले आहे. याच काळातील इतर ग्रंथांमध्ये विघ्न आणि विनायकाला गजमुख म्हटलेले दिसते. मूळच्या विघ्न निर्माण करणाऱ्या विनायकाची शांती करून त्याला प्रसन्न करून घेता येते व त्यानंतर तो विघ्नांचे हरण करतो अशी मान्यता रूढ झाली, असे आढळते. नंतर इसवी सनाच्या दुसऱ्या/तिसऱ्या शतकात त्याला गजमुख किंवा गजानन म्हणून संबोधले जाऊ लागले व त्याच काळात त्याच्या मूर्ती घडवल्या जाऊ लागल्या.

इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात उत्तर भारतात कुशाण सत्ता होती. या कुशाण राजांच्या नाण्यांवर स्कंद, कुमार, विशाख आणि महासेन अशा चार देवतांचे अंकन दिसून येते. या चार देवतांच्या एकत्रीकरणातून काíतकेय हा एकच एक देव झाला व ही चार त्याची नावे ठरली. याच काळात चार विनायकांचा मिळून एक विनायक अथवा गणपती बनला आणि यानंतर निर्माण झालेल्या अनेक पुराणांमधून या गणेशाबद्दलच्या अनेक पुराणकथा उदयाला आल्या.

Ganesh Chaturthi 2022: गणपतीत बिनधास्त खा उकडीचे मोदक; ‘या’ समस्यांवर आहे रामबाण उपाय

गणेशाची अंकने

भारताच्या वायव्येला असणाऱ्या सध्याच्या पाकिस्तानातील गांधार प्रदेशातील जमातींमध्ये पवित्र असणाऱ्या हत्तीचे लौकिक देवतेत रूपांतर होऊन त्याला गजमुख आणि मानवी शरीर अशा स्वरूपातील एक यक्ष असे रूप देऊन, त्याची सांगड विनायक, गणेश व गणपतीशी घालण्यात आली असावी या निष्कर्षांप्रत डॉ. ए. के. नरेन व डॉ. म. के. ढवळीकर हे तज्ज्ञ येऊन पोचले.

भारतात प्राचीन काळी हत्ती हा पवित्र प्राणी मानला जात असावा. भगवान बुद्धाच्या जन्माच्या आधी त्यांच्या आईला स्वप्नात हत्ती दिसल्याचे उल्लेख आहेत. यावरूनच सम्राट अशोकाने संकिशेच्या अशोकस्तंभावर हत्तीचे शिल्प उभारले असावे. सम्राट अशोकाच्या कलसी (उत्तराखंड) येथील शिलालेखाशेजारी एका हत्तीचे सुबक रेखाचित्र कोरलेले आहे व सोबत ‘गजतमे’ असा तत्कालीन ब्राह्मीलेख कोरलेला आहे. गजतमे म्हणजे गजोत्तम अर्थात सर्वात उत्तम हत्ती! यावरून तत्कालीन समाजात हत्तीला महत्त्वाचे स्थान असावे असा अंदाज बांधता येतो.

शुआन जांग (ह्युएन त्सांग) या चिनी बौद्ध भिक्षूने इसवी सनाच्या ७ व्या शतकात भारतास भेट दिली तेव्हा तो तक्षशिला (आता पाकिस्तानात) व कपिशा (अफगाणिस्तानातील विद्यमान बेग्राम) येथेही गेला. या दोन्ही ठिकाणची नगरदेवता हत्ती आहे, असे त्याने लिहून ठेवले आहे. तसेच या कपिशानगराच्या नाण्यावर हत्तीचे अंकन असून त्यावर ‘कपिशिये नगरदेवता’ (म्हणजे कपिशेची नगरदेवता) असा त्या नाण्यावर खरोष्टी लिपीमध्ये लेख आहे. शुआन जांगच्या (ह्युएन त्सांग) म्हणण्यानुसार कपिशेच्या नर्ऋत्येला असणाऱ्या डोंगरात या हत्तीरूपी देवतेचा निवास होता व त्यास ‘पिलो शो लो’ (प्राकृतमध्ये पिलूसार – पिलू म्हणजे हत्तीशी संबंधित नाव) असे नाव होते. पाकिस्तानातील पुष्कळावती (आताचे चारसाढा) येथे सापडलेल्या नाण्यावरही ‘पुष्कलावती नगरदेवता’ असे लिहिलेले असून त्यावर हत्तीचे शीर्ष, डोंगर व मानवाकृती आहे. रॅपसन या संशोधकांनी हे अंकन शुआन जांगने वर्णन केलेल्या हत्तीरूपी देवतेचे म्हणजेच ‘पिलो शो लो’चे आहे हे सिद्ध करून दाखवले. यावरून सध्याच्या पाकिस्तान व अफगाणिस्तान या भागांत प्राचीन काळी हत्ती हा पवित्र प्राणी मानला जाऊन अनेक नगरांची देवता म्हणून पूजलाही जात असावा हे सिद्ध होते!

अर्थात अफगाणिस्तानात हत्ती कसे आले, असा प्रश्न पडू शकतो. पर्शिअन राजा पहिला दरायस याने इसवीसनापूर्वी ६व्या शतकात सिन्धूच्या खोऱ्यातील गांधार प्रदेश जिंकून पर्शिअन साम्राज्याला जोडला, कदाचित त्यानंतर भारतीय हत्तींचा वापर पर्शिअन साम्राज्यात सुरू झाला असावा. हे पर्शिअन साम्राज्य आत्ताच्या तुर्कस्थानपासून, उत्तर इजिप्त व सौदी अरेबिया व्यापून अफगाणिस्तान व पाकिस्तानपर्यंत पसरलेले होते. इसवीसनापूर्वी चौथ्या शतकात पर्शिअन राजा तिसरा दरायस व अलेक्झांडर यांच्या झालेल्या युद्धात पर्शिअन सन्यात १५ भारतीय हत्ती वापरले गेले होते, असा ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केला आहे. तसेच अलेक्झांडर आणि पोरस या दोघांमधील झेलम नदीच्या काठी झालेल्या युद्धात पोरसने हत्तींचा वापर केला होता, असे ग्रीक इतिहासकार सांगतात. यावरून सध्याच्या इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात भारतीय हत्ती केवळ माहीत होते असे नव्हे, तर ते युद्धातील वापरासाठीही प्रसिद्ध होते. इसवीसनानंतरच्या तिसऱ्या/चौथ्या शतकातही पर्शिअन राजांनी हत्ती व त्यांचे माहूत भारतातून आणल्याचे उल्लेख आढळतात. यावरून सध्याच्या अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या हद्दीच्या प्रदेशातील काबूल नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना इसवीसनापूर्वी ६ व्या शतकापासून हत्ती माहीत होता, हे लक्षात येते.

पाणिनी या संस्कृत व्याकरणकाराने इसवीसनापूर्वी ५व्या शतकात लिहिलेल्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात हत्तीचा तसेच हास्तिनायनांच्या जमातीचा उल्लेख आहे. पाणिनी हा अटक, पेशावर या भागातील रहिवासी होता. त्यामुळे त्याने केलेला हत्तीचा व हास्तिनायनांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. याच हास्तिनायनांचा उल्लेख अलेक्झांडरच्या ग्रीक इतिहासकारांनी व नंतरच्या काळात रोमन भूगोलकारांनी व इतिहासकारांनी ‘अस्तेकनॉय’ असा करून त्यांची वसाहत काबूल व स्वात नद्यांच्या खोऱ्यात होती व पुष्कळावती ही त्यांची राजधानी होती, असेही नमूद केले आहे. या हास्तिनायनांचे कुलचिन्ह हत्ती असावे आणि म्हणून त्यांच्या जमातीचे नावही हत्तीवरून पडलेले दिसून येते.

इसवीसनपूर्वी पहिल्या शतकात फिलोस्ट्रटस नावाच्या ग्रीक लेखकाने तक्षशिलेचे वर्णन करताना तेथील एका दीर्घायुषी हत्तीचे वर्णन केले आहे. हा हत्ती पोरसशी तह केल्यानंतर अलेक्झांडरने तक्षशिलेतील सूर्यमंदिराला अर्पण केला होता. तक्षशिलावासी या हत्तीची पूजा करत. या हत्तीच्या गळ्यातील घंटेचे वर्णनही या ग्रीक लेखकाने केले आहे. याच प्रदेशात अलेक्झांडरनंतर आलेल्या डिमीट्रीयस (पहिला), मिनेंडर, राजांनी (इसवीसनपूर्व दुसरे व पहिले शतक) या भागातील पवित्र हत्तीरूपी देवतेच्या छत्रछायेखाली आपण सुरक्षित आहोत हे दाखवण्यासाठी जणू हत्तीचे शिर हे शिरोभूषण म्हणून नाण्यांवर वापरले. या इंडोग्रीक राजांची नाणी अत्यंत सुबक असत. त्यात एका बाजूला राजाचा मुखवटा असे. या राजाच्या मुखवट्यावर शिरोभूषण म्हणून हत्तीचे शिर वापरलेले दिसते. अर्थात या पवित्र हत्तीच्या कृपेमुळे आपल्याला यश मिळो, अशी भावना त्यात असू शकते. याच भावनेचा अंतर्भाव कार्य यशस्वी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या गणेशपूजनात दिसतो.

यानंतरच्या काळातील अँटी अल्कायड्स या इंडोग्रीक राजाच्या तसेच शकराजा मोयस याच्या नाण्यांवर हत्तीला विशेष स्थान मिळाले. या नाण्यावर हत्तीचे पुढचे शरीर दिसत असून त्याची सोंड उंचावलेली आहे. या सोंडेत त्याने हार धरलेला आहे. तसेच हत्तीच्या गळ्यातील घंटा यात स्पष्ट दिसते आहे. या हत्तीच्या पुढे ग्रीक देवतांचे अंकन असल्यामुळे हत्तीला या देवतांच्या बरोबर स्थान मिळाले होते असे दिसते.

अशा पद्धतीने हत्ती या पवित्र प्राण्याचा, लौकिक देवतेच्या स्वरूपात प्रवास सुरू झाला. यापुढील टप्पा म्हणजे गजमुख व मानवी शरीर या स्वरूपातील गजयक्षाचे अंकन. हम्रेस (इ.स.पूर्व ५०) या इंडोग्रीक राजाच्या नाण्यावर एका बाजूला राजाचा मुखवटा व दुसऱ्या बाजूला सिंहासनावर बसलेली देवता यांचे अंकन आहे. प्राध्यापक अवधा किशोर नारायण यांच्या मतानुसार या देवतेचे शिर हत्तीचे आहे. त्यांचे हे मत ग्रा मानले तर गजाननाचे हे सर्वात प्राचीन अंकन आहे. अर्थात सर्व संशोधकांना ही देवता गजमुख आहे असे वाटत नाही. काहींच्या म्हणण्यानुसार ही मानवी चेहऱ्याची देवता आहे.

अर्थात या नंतर मूर्ती स्वरूपात आपल्याला गजमुखी यक्ष दिसू लागतो. गणेशाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ठेंगणा बांधा, आखूड मांडय़ा, तुंदिलतनू, विशाल उदर, हीच वैशिष्ट्ये प्राचीन यक्ष प्रतिमांचेदेखील आहेत. या बाबतीत गणपती आणि कुबेर यक्ष यांच्या मूर्तीमध्ये साम्य आढळून येते. कुशाण राजांच्या काळात निर्माण झालेल्या काही मूर्ती मथुरा संग्रहालयात आहेत. यावरून गजमुखी यक्ष अथवा आजच्या गजाननाच्या मूर्ती इसवीसनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात निर्माण होत होत्या हे स्पष्ट होते. मथुरा संग्रहालयातील या मूर्ती लाल दगडाच्या आहेत. संकिशा येथे मिळालेली उभी द्विभुज गणेशाची मूर्ती. याच्या डाव्या हातात मोदकाची वाटी असून तिच्यावरच त्याने सोंड टेकली आहे. उजव्या हातातील वस्तू ओळखता येत नाही. इतर तीन प्रतिमा द्विभुज असून विशाल उदराच्या आहेत. यांच्या हातात मोदकपात्र असून सापाचे जानवे आहे. एकच दात, सर्पजानवे, मोदकपात्र व अलंकारविहीन मूर्ती हे या प्राचीनतम गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ होय.

यानंतरच्या गणेशमूर्ती गुप्त राजांच्या काळात (इसवीसन पाचवे /सहावे शतक) दिसायला सुरुवात होते. उत्तर भारतात उदयगिरी, अहिच्छत्र, भितरगाव, देवगढ, राजघाट इत्यादी ठिकाणी या मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्तीची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे सांगता येतील: या गणपतीचे हत्तीचे शिर नसíगक आहे. त्यावर मुकुट अथवा अलंकार नाही. सर्व गणपती डाव्या सोंडेचे आहेत. देवगढ येथील गणेशमूर्तीच्या हातात मोदकपात्र नाही, परंतु परशू, दात/मुळा घेतलेला दिसतो. मुळा हा गणपतीच्या लांच्छनापकी एक दाखवला जावा असे प्राचीन ग्रंथातून नमूद केले आहे. त्याचीच जागा नंतर दाताने घेतली. या मूर्तीच्या सोबत उंदीर नाही. या मूर्ती अलंकारविरहित आहेत, परंतु सर्पजानवे मात्र आहे. तसेच उदयगिरी व काबूल येथे सापडलेली गणेशमूर्ती ऊध्र्विलगी आहेत.

काबूल येथील महाविनायक

गणेशाच्या प्राचीन मूर्तीपैकी सर्वात महत्त्वाची मानली गेलेली मूर्ती म्हणजे काबूल येथील महाविनायकाची प्रतिमा. पाकिस्तान व अफगाणिस्तान या भागांत हत्ती हा पवित्र प्राणी व लौकिक देवता म्हणून पूजला जात होताच. त्यामुळे या भागात विनायकाची प्रतिमा सापडणे अशक्य नाही.

अफगाणिस्तानातील गार्देज या ठिकाणी २० व्या शतकात सापडलेली ही महाविनायकाची प्रतिमा काबूलला आणण्यात आली. तेथे बाबा पीर रतनानाथ दग्र्यात तिची पुनस्र्थापना करण्यात आली व तिथे तिचे १९७०च्या दशकापर्यंत पूजन होत होते.

या प्रतिमेच्या बठकीवर दोन ओळींमध्ये संस्कृत भाषेत व ब्राह्मी लिपीत लेख कोरलेला आहे. ‘परमभट्टारक महाराजाधिराज शाही िखगल याने त्याच्या राज्याच्या आठव्या वर्षी महाज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला विशाखा नक्षत्रावर, सिंह लग्न असताना या महाविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली’ असा तो लेख आहे. हा शाही िखगल राजा कोण याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकमत नाही, कारण त्या नावाचे अथवा पदवीचे दोन राजे अफगाणिस्तानात हुणांच्या अल्कोन गटात आढळतात. या राजवटीतील तोरमान आणि मिहिरकुल या राजांनी उत्तर भारतात शिरकाव केला होता व त्यांचे गुप्त राजांशी युद्धही झाले होते, परंतु या मूर्तीच्या शिल्पशैलीवरून व नाणकशास्त्रीय पुराव्यावरून ही मूर्ती हूण राजा िखगल (इ.स. ४४०-४९०) अथवा त्याच्यानंतर आलेला नरेंद्र (इ.स. ५४०-५८०) यांच्या राजवटीतील असावी, कारण ‘राजतरंगिणी’ या काश्मीरमधील ग्रंथात नरेंद्र याचे नाव िखखील नरेंद्रादित्य असे आढळते. तरीदेखील ही महाविनायकाची मूर्ती हूणांच्या गटातील राजाने स्थापन केली होती ही महत्त्वाची बाब नाकारता येत नाही. या मूर्तीचा काळ इ.सनाचे ५वे अथवा ६वे शतक असा येतो.

ही संगमरवरात घडवलेली महाविनायकाची मूर्ती (उंची २८ इंच व रुंदी १४ इंच) आलीढ आसनात उभी आहे. कदाचित अफगाणिस्तानातील ग्रीक कलेच्या प्रभावामुळे या मूर्तीचे हात, पाय व छाती बऱ्यापकी पिळदार दाखवले आहेत. सोंड डावीकडे वळलेली असून तुटली आहे. ही मूर्ती एकदंत आहे. डोक्यावर मुकुट असून गळ्यात हार आहे. हा मुकुट रिबिनीने डोक्याच्या मागच्या बाजूला बांधला आहे. अशा पद्धतीने काबूल येथे सापडलेल्या सूर्य मूर्तीचा मुकुटदेखील रिबिनेने बांधलेला कोरण्यात आला होता. तत्कालीन पíशअन राजे अशा पद्धतीने मुकुट बांधत असत. त्यामुळे हा पíशअन प्रभाव या गणेशमूर्तीवर दिसून येतो. या मूर्तीला चार हात होते, पण ते तुटले आहेत. मूर्तीला सर्पजानवे घातले असून कमरेखाली व्याघ्रचर्म नेसले आहे. मूर्ती लंबोदर व ऊध्र्विलगी दाखवलेली आहे.

अफगाणिस्तानावरील सोव्हिएत आक्रमणानंतर १९८० मध्ये ही मूर्ती काबूलमधील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आली. त्यानंतर आलेल्या तालिबान राजवटीत काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाची नासधूस करण्यात आली. या दरम्यान अनेक मूर्ती चोरीला गेल्या. संग्रहालयातील रजिस्टरमध्ये या मूर्तीची नोंद आहे, परंतु दुर्दैवाने तालिबान राजवटीनंतर या मूर्तीचा ठावठिकाणा अद्याप लागू शकलेला नाही. त्यामुळे या मूर्तीच्या छायाचित्रावरच आता समाधान मानावे लागते.

काबूल येथील दुसरी गणेशमूर्तीदेखील वैशिष्टय़पूर्ण आहे. ही संगमरवरी मूर्ती काबूलपासून १० किमी लांब असलेल्या सकर दरा येथे मिळाली होती. या मूर्तीबरोबरच येथे सूर्य आणि शिवाची मूर्ती आढळून आली होती. ही गणेशाची मूर्ती काबूलमधील शोर बाजार येथे आणण्यात आली व तेथे ती पुजली जात असे. याही मूर्तीचा ठावठिकाणा सध्या माहीत नाही. ही गणेशमूर्तीदेखील लंबोदर व ऊध्र्विलगी दाखवलेली होती. या गणेशाला सर्पजानवे घातले असून छाती पिळदार दाखवण्यात आलेली होती. या मूर्तीस चार हात होते. मूर्तीचा वरचा डावा हात तुटलेला होता, तर खालील दोन्ही हात शेजारी उभ्या असलेल्या गणांच्या डोक्यावर ठेवलेले होते. या गणांचे कुरळे केस, कानातील पत्रकुंडले भारतातील गुप्तशैलीचा प्रभाव दाखवतात. या मूर्तीवर कोणताही शिलालेख नाही. या मूर्तीवर ग्रीक शैलीचा कमी, तर गुप्त शैलीचा जास्त प्रभाव आहे. यावरून ही मूर्ती कदाचित इसवी सनाच्या चौथ्या शतकातील (कुशाण व गुप्त राजवटींच्या मधल्या काळातील) असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे १९८० पर्यंत ही मूर्ती काबूलमधील िहदूंकडून मंदिरात पुजली जात होती.

गुप्तकाळानंतर म्हणजे इसवीसनाच्या सहाव्या शतकानंतर गणेशमूर्ती अधिक संख्येने निर्माण होऊ लागल्या व त्यांच्या प्रकारातही वाढ होऊ लागली. अनेक भुजा असलेल्या तशाच विविध आसनांत या गणेशमूर्ती निर्माण होऊ लागल्या, त्यामागे या देवतेची वाढणारी लोकप्रियताच होती. नृत्य गणेश, महागणपती, शक्तिगणेश, पंचविनायक, हेरंब अशा विविध स्वरूपांत त्याची पूजा होऊ लागली आणि केवळ उत्तर भारतातच नाही, तर दक्षिण भारतातदेखील गणपती एक लोकप्रिय देवता ठरला. पंचायतनात गणेशाला स्थान मिळाले, तर इसवीसनाच्या १५०० वर्षांनंतर या देवतेची लोकप्रियता प्रचंड वाढून गाणपत्य पंथाची निर्मिती झाली तसेच गणेशपुराण व मुद्गलपुराण या पुराणांची रचना करण्यात आली.

महाराष्ट्रात १८व्या शतकात गाणपत्य पंथाचा पेशव्यांनी आणि अनेक सरदार घराण्यांनी पुरस्कार केल्यामुळे अष्टविनायक प्रसिद्ध झाले, तर स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वाना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली.

अशा या लोकप्रिय देवतेचा, गणेशाचा, उगम आणि प्रवास मूर्ती, नाणकशास्त्रीय व लिखित पुराव्यातून शोधून काढण्याचा प्रयत्न अनेक तज्ज्ञांनी आजवर केला आहे. हा शोध अर्थातच इथे थांबत नाही. यातील अनेक दुवे पुन्हा तपासून, नवीन सापडणारे पुरावे ग्रा धरून ना जाणो उद्या अजून काही आपल्या हाताला लागेल!

Story img Loader