Ganesh Chaturthi 2022: कितीही डाग असले तरी सौंदर्याचे प्रतीक म्हणून चंद्राची आजही उपमा दिली जाते. चंद्राचे दर्शन घेणे शुभ मानले जाते, ज्यादिवशी उपवास असतो तेव्हा सुद्धा चंद्रोदयाच्यानंतरच अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. असं असलं तरी वर्षातून एकदा म्हणजेच गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेणे चांगलेच महागात पडू शकते. पौराणिक आख्यायिकेनुसार गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेणाऱ्या व्यक्तीवर चोरीचा आळ येतो. याचीच प्रचिती स्वतः श्रीकृष्णाला सुद्धा आली होती. नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे गणपती बाप्पा चांदोबावर इतके चिडले होते, चला तर जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आख्यायिकेनुसार, एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरतात आणि त्यांना बघून चंद्र हसू आवरत नाही. हे इतकं निमित्त होतं आणि गणपती चंद्रावर इतके चिडले की त्यांनी थेट चंद्राला शाप दिला आणि आजपासून तुझे कोणीही तोंड पाहणार नाही, उलट जो कोणी तुझे तोंड पाहिलं त्याच्यावर चोरीचा आळ येईल असेही बाप्पा रागात म्हणाले. Ganesh Chaturthi 2022: पवित्र तुळशीला गणपतीने का दिला होता शाप; वर्षात फक्त ‘या’ दिवशी मिळतो मान

यानंतर चंद्राने मोठे तप करुन गणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी विनंती केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. मात्र वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणीही चंद्र पाहणार नाही असे सांगितले. एक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत” केल्यामुळे गेला. Ganesh Chaturthi 2022: गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहावी? जाणून घ्या यामागचे कारण

श्री गणेश चतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पहाणे वर्जित आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार, समजा अनावधानाने गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन झाले तर त्या व्यक्तीने निदान एका मासातील संकष्ट चतुर्थी व्रत करावे. व या मंत्राचा जप करून व्रत सोडावे

सिंहःप्रसेनमवधीत्, सिंहो जाम्बवता हतः।
सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः।।

यंदा ३१ ऑगस्ट २०२२ ला भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आहे. आपल्याला येत्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

(टीप- सदर लेख हा प्राप्त माहितीनुसार आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)