Ganesh Chaturthi 2023: देशभरात गणेश चतुर्थीची तयारीला सुरू झाली आहे. हिंदू पंचागानुसार यावर्षी मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ पासून देशभरात गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे, जो २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशीला संपणार आहे. यावेळी देशभरातील मोठमोठ्या मंडळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. तर लाखो भाविक आपल्या घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून त्यांची विधिवत पूजा करतात. पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला सुरू होतो. या उत्सवात बाप्पाच्या विधीवत पूजेबरोबरच नैवेद्य वगैरे केले जातात. जर तुम्हालाही या वर्षी तुमच्या घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करायची असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

जर तुम्ही घरी गणेशाची प्रतिष्ठापना करत असाल तर तुम्हाला हे देखील माहिती असायला हवं की घरात कोणत्या प्रकारची गणेशमूर्ती बसवायची असते. कारण चुकीची मूर्ती आणणे शुभ मानले जात नाही. गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. काही लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि चुकीची मूर्ती घेऊन घरी येतात, त्यामुळे त्यांना गणेशाचा आशीर्वाद मिळत नाही असंही मानलं जाते. तर गणपतीची मूर्ती नेमकी कशी असावी याबाबतची माहिती शैलेश जोशी गुरुजी यांनी दिली आहे ती जाणून घेऊया.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Tipeshwar Wildlife Sanctuary yavatmal
टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा विक्रमच! आधी ३२०० किलोमीटर, आता ५०० किलोमीटर
How To Get Rid Of Rats In House
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?

हेही वाचा- बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा तळणीचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

गणपतीची मूर्ती कशी असावी –

बाजारात विविध प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती उपलब्ध असतात पण तुम्ही शक्यतो बसलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करु शकता. अशी मूर्ती घरी आणल्याने सुख, समृद्धी आणि शांती लाभते असे मानले जाते.

मूर्तीचे तोंड कुठे असावे –

गणेशमूर्तीचे तोंड एकतर पश्चिमेकडे असावे किंवा पश्चिमेकडे पाठ करुन पूर्वेकडे तोंड असावे.

मोदक आणि उंदीर असणं गरजेचं –

मूर्ती खरेदी करताना गणपतीच्या डाव्या हातावर मोदक असावा, गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे. आपल्या घरात सर्वकाही गोड घडावं म्हणून गणपतीच्या डाव्या हातात मोदक ठेवला जातो. तर उंदीर गणपतीच्या डाव्या पायाशेजारी असणारी मूर्ती असावी.

हेही वाचा- Pune Modi Ganpati Mandir : पुण्यातील या गणपतीला ‘मोदी गणपती’ नाव कसे पडले? जाणून घ्या ‘मोदी गणपती’चा इतिहास….

गणपतीची सोंड कोणत्या दिशेला असावी?

वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती आणताना त्याची सोंड कोणत्या दिशेला आहे हे लक्षात ठेवा. गणपतीची अशी मूर्ती विकत घ्या ज्याची सोंड गणपतीच्या डाव्या हाताला असावी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने सुख-समृद्धी येते असं मानलं जाते. तसेच गणपतीच्या मूर्तीचे सोवळे पितांबरी किंवा पिवळ्या रंगाचे असावे. तसेच सोवळ्याला सोनेरी कडा असाव्या तर गणपतीच्या गळ्यात कंठीचा हार असावा. महत्वाचं म्हणजे गणपती आपणाला उचलता येईल येवढाच असावा तो फार मोठा नसावा कारण तो आपणाला उचलताना अडचण येऊ शकते.

गणपतीची मूर्ती कोणत्या प्रकारची आणावी?

बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही केवळ पर्यावरणपूरक मातीचीच मूर्ती आणावी, कारण तुम्ही ती पाण्यात सहजपणे विसर्जित करता येऊ शकते.

Story img Loader