Gauri Pujan 2023: राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक घरात, मंडळांमध्ये लाडक्या बाप्पासाठी सजावटीचे काम सुरू आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आस लागली आहे. यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला आहे. या दिवसापासून पुढील पाच ते २१ दिवस भक्तगण गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात. गणपती बाप्पाबरोबर येणाऱ्या गौराईच्या स्वागताचीही एक परंपरा महाराष्ट्रात साजरी केली जाते. घरोघरी या माहेरवाशिणीचे वेगवेगळ्या रुपात स्वागत करत पाहुणचार केला जातो. यामुळे या सणाला गौरी गणपतीचा सण असेही म्हटले जाते आणि महाराष्ट्रात तो भक्तीभावाने, उत्साहात साजरा केला जातो. या गौराईच्या स्वागतावेळी कोकणात नववधूने ओवसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते.

गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते. गौराईच्या सणाचे विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वेशीवेशीवर या माहेरवाशिणीच्या पूजेची पद्धत, नैवेद्याची पद्धत बदलते. वाजत, गाजत, नवी साडी- चोळी आणि दागिन्यांनी मढवून गौराईला घरी आणले जाते. या गौराईची स्थापना, तयारी माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी गौरीचा ओवसा भरण्याची पद्धत साजरी केली जाते.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक गावांमध्ये ओवसा भरण्याची पद्धत मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतर ज्यावर्षी गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये येतात, तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर पहिला ओवसा भरल्यानंतर प्रत्येक वर्षी गौरीसमोर ओवसा भरला जातो. पण, लग्नानंतर पहिल्या वर्षी ओवसा नसेल भरला, तर ज्यावर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत ओवसा भरण्याची वाट पाहावी लागते. त्यामुळे पहिला ओवसा नववधूसाठी महत्वाचा असतो.

Ganesh Chaturthi 2023: गोड मोदक नेहमीच खाता; आता झणझणीत, मसालेदार ‘मोदकाची आमटी’ खाऊन पाहा… ही घ्या रेसिपी

पण, सिंधुदुर्गातील काही गावांमध्ये गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये आल्या नसल्या तरी घरातील नववधू पहिला ओवसा भरते. याशिवाय रायगडमधील काही गावांमध्ये गौरीच्या दिवशी लग्नाआधी कुमारिकादेखील ओवसा भरतात.

ओवसा म्हणजे गौरीला ओवसणे किंवा ओवाळणे. काही ठिकाणी ओवाश्याला ववसा असंही म्हणतात. ओवसा या परंपरेच्या माध्यमातून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान आणि आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. पण, अनेक जण ओवश्यात पैसेही ठेवतात.

ओवसा कसा भरला जातो?

ओवश्याला नववधू माहेरची आणि सासरची ठराविक सुपं भरून गौराईला ओवसते. ही सूपं बांबूपासून तयार केलेली असतात. काही ठिकाणी पाच, तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओवसा भरला जातो; तर काही गावांमध्ये माहेरचीच दहा सुपं असतात. या सुपांना दोऱ्याच्या साहाय्याने गुंडाळून हळदीकुंकू लावले जाते. या सुपांमध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या पानात ठेवत त्यात पाच प्रकारची फळं, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी भरली जाते. ही पाच किंवा दहा सुपांनी गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसते. यानंतर ही सुपं तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींच्या हातात देऊन आशीर्वाद घेते. या सुपांच्या बदल्यात नववधूला साडी, पैसे, सोन्या-चांदीचे दागिने भेट म्हणून दिले जातात. या पद्धतीने कोकणात घरातील सुनेचा किंवा माहेरवाशिणीचा मानसन्मान केला जातो.

कोकणात ओवसा भरण्याच्या परंपरेचे महत्व

गौराईला आदिशक्तीचे रुप मानले जाते. यामुळे गौराईची ओटी भरून सुनांना आणि मुलींना तिच्यासारखे सामर्थ्य मिळावे यासाठी ही प्रथा साजरी केली जाते. यातील सूप हे घरातील सुबत्तेचं प्रतीक मानले जाते; तर भरलेले सूप ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. ओवसा भरण्याच्या परंपरेच्या माध्यमातून नव्या सुनेला तिच्या घरातील थोरामोठ्यांची ओळख करून दिली जाते. पण, काळानुसार ही प्रथा बदलताना दिसतेय.

Story img Loader