Ganesh Chaturthi Special Modak: गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया! आला रे आला गणपती आला… महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाचा आवडता पदार्थ मोदक मानला जातो. ‘मोदकांचा नैवेद्य जो दाखवील, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील,’ असे मानले जाते. त्यातही प्रांतानुसार आणि तिथल्या पिकांनुसार मोदकाचे विविध प्रकार तयार झाले आहेत. तर काहींना आधुनिक टचही मिळाला आहे. त्यामुळे गणपतीला तेच ते मोदकांचा नैवेद्य दाखवण्याऐवजी यंदा काहीतरी स्पेशल मोदक तयार करायला हवे. नाही का! चला तर बाप्पासाठी खमखमीत मोदक तयार करू आणि आपल्या लाडक्या बाप्पाला खुश करू. यात आम्ही तुम्हाला ‘या’ ५ विशेष मोदकांची माहिती देणार आहोत.

मोदकचे दोन मुख्य प्रकार

मोदक हे बाप्पांचे सर्वात प्रिय अन्न मानले जाते. गणेश चतुर्थीला हे खास करून बनवले जातात, आणि प्रसाद म्हणून यांचा उपयोग केला जातो. मोदकचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे उकडीचे मोदक, आणि दुसरा म्हणजे तळलेले मोदक हा एक गोड पदार्थ आहे. जो सर्वाचा लोकप्रिय आहे, यामध्ये काही लोक खव्हाचे सुध्दा मोदक तयार करतात. जे एकदम स्वादिष्ट लागतात.

Protest in Vasai Virar Municipal Corporation due to neglect of Dr Babasaheb Ambedkar statue
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास चालढकल; संतप्त कार्यकर्त्यांचे ३ तास ठिय्या आंदोलन
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Ner Taluka, groom marriage, groom Ner bullock cart ,
यवतमाळ : शेतकरी नवरदेवाने घोड्यावरून नव्हे तर बैलबंडीवरून काढली लग्नाची वरात, स्वत: धुरकरी बनलेल्या युवकाचे पंचक्रोशीत कौतुक
police lathicharge on citizens thronged in Kitadi forest area to see tiger
भंडारा : वाघ पाहण्याची उत्सुकता; तुफान गर्दी अन् पोलिसांवरच …
Animal morgue to open in Malad Mumbai print news
मालाडमध्ये प्राण्यांचे शवागार सुरू होणार; येत्या महिनाभरात सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस
dogs in Chernobyl
किरणोत्सर्गामुळे कुत्र्यांमध्ये उत्परिवर्तन? चेर्नोबिलचे ‘म्युटंट’ कुत्रे का बनलेत संशोधकांसमोर कोडे?
Ambedkar thoughts, Assembly Elections, Politics,
आंबेडकरी अभिव्यक्तीला नवी पालवी…
potholes on pune nashik highway causes accident
नाशिक-पुणे मार्गावरील गुरेवाडी चौफुली खड्ड्यांमुळे अपघातप्रवण; अपघात वाढत असताना टोल कंपनीची डोळेझाक

 ‘या’ पाच प्रकारच्या मोदकांचा बाप्पाला दाखवा नैवेद्य

१. चॉकलेट मोदक

चॉकलेट मोदक अनेकांचा आवडता पदार्थ आहे. खवा, खोबरे, दाणे बारीक करून मळून त्याला मोदकाचा आकार द्यावा. एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवा. चॉकलेट मोदक खास करून लहान मुलांचा आवडीचा पदार्थ आहे.

(हे ही वाचा : Ganesh Chaturthi 2023: www.loksatta.com/ganeshutsav/ganesh-chaturthi-2023-recipes-ganpati-special-how-to-make-chana-dal-modak-in-marathi-purnache-modak-recipe-in-marathi-sjr-98-3912993/गणपती बाप्पासाठी बनवा खास ‘पुरणाचे मोदक’; जाणून घ्या रेसिपी )

२. पंचखाद्याचे मोदक

पंचखाद्य मोदक खायला अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. हे बनविण्यासाठी खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखर एकत्र करून सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा. यात अंजीर किवा खजुराची पेस्टही घालता येईल. हे मोदक चवीला अतिशय चवदार लागतात.

३. खव्याचे मोदक

‘खव्याचा मोदक’ सर्वत्र मिळणारा हा पदार्थ आहे. हलवाई दरवर्षी यामध्ये विविध चवीसह घेऊन येतात. हाच मोदक घरी करताना खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात. याची चवही अप्रतिम असते. त्यामुळे आपण हे मोदक यंदा बनवू शकता.

४. मिक्स मोदक

मिक्स मोदक हा देखील बाप्पांच्या आवडीचा मोदक आहे. यासाठी पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे लागते. वाफवलेले हे मोदक आरोग्यासाठी देखील चांगले असतात.

५. तांदळाचे गुलकंदी मोदक

तांदळाचे गुलकंदी मोदक अनेकांना आवडतात. सर्वप्रथम तांदुळाची उकड काढून त्यात गुलाब पाकळया किंवा गुलाब जल टाकावे. त्यानंतर उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळून किंवा वाफवून घ्यावेत.

तर, मंडळी तुम्ही अश्या ५ विशेष प्रकारचे चविष्ट मोदक तयार करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला खुश करू शकता.

Story img Loader