Chana Dal Modak Recipe: गणेश चतुर्थी हा सण देसभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव काळात मोठा उत्साह आणि चैतन्य अनुभवता येते. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थी उत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात भक्त बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विशेष तयारी करतात, यात बाप्पाला मोदक खूप आवडत असल्याने अनेकजण घराघरात मोदक बनवण्याचा घाट घालतात. गणेश चतुर्थीला बाप्पाला विशेषत: २१ उकडीच्या मोदकांचा नैवद्य दिला जातो. पण आत्तापर्यंत आपण तांदळाच्या पीठापासून उकडीचे मोदक बनवले आपण आज आपण चनाच्या डाळीपासून उकडीचे मोदक म्हणजे पुरणाचे मोदक कसे बनवतात त्याची रेसिपी पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरणापासून उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी

१) तांदळाचे पीठ
२) मीठ
३) उकळते पाणी
४) तिळाचे तेल
५) गूळ
६) पाणी
७) चणा डाळ
८) किसलेला नारळ
९) वेलची पावडर
१०) तूप

हेही वाचा -Modak Recipe Tips: उकडीचे मोदक बनवताना कळ्या तुटतायत? मग चमचाची ‘ही’ सोप्पी ट्रिक एकदा करुन पाहाच

पुरणाचे मोदक बनवण्याची कृती

चण्याच्या डाळीपासून उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी घ्या आणि त्यात चण्याची डाळ टाकून ४ शिट्या होऊ द्या. यानंतर कुकर पाच मिनिटे मंद आचेवर ठेवा. यानंतर कुकर थंड झाल्यावर उघडा.

आता एका पॅनमध्ये पाणी घ्या आणि त्यात पुन्हा एक भांड घ्या आणि त्यात गुळ वितळेपर्यंत गरम करा. आता ते नीट वितळल्यानंतर बाजूला ठेवा. आता परत तोच पॅन गॅसवर ठेवा आणि त्यात किसलेला नारळ आणि शिजवलेली चणाडाळ मिक्स करा. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवत रहा. त्यात वेलची पूड आणि तूप आणि वितळलेले गूळ घालू मिक्स करा. यात डाळ एकदम चांगल्याप्रकारे मिक्स झाली पाहिजे. आता एका भांड्यात हे मिश्रण काढून थंड होऊ द्या.

आता पीठ मळून घ्या. यासाठी एका खोलगट पातेल्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ आणि १ चमचा तेल घाला. या पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करा, आता १५ मिनिटे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात १ चमचा तेल घालून पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या.

आता मोदकाचा साचा घ्या किंवा तुम्ही हातानेही हे मोदक करु शकता. यावेळी पीठाच्या गोळ्याला थोडं तूप लावा आणि गोळा साच्यात समान रीतीने पसरवा. आता तयार केलेले सारण भरून मोदकाची खालची बाजू पीठाने झाकून घ्या. साचा उघडा आणि मोदक प्लेटमध्ये ठेवा. आता सर्व तयार झालेले मोदक स्टीमरमध्ये किंवा तुम्ही उकड काढण्यासाठी ठेवत असलेल्या भांड्यात १० ते १२ मिनिटे ठेवत वाफवून घ्या. अशाप्रकारे तुमचे पुरणापासून बनवलेले उकडीचे मोदक तयार झाले.

तुम्ही आवडत असलेल्या तुम्ही हे सारण वापरुन गव्हाच्या पीठपासून तेलात तळलेले मोदकही बनवू शकता.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2023 recipes ganpati special how to make chana dal modak in marathi purnache modak recipe in marathi sjr
Show comments