History, Culture and Significance of Famous Ganesh Mandals in Mumbai Maharashtra and India : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा गणरायाचा जयघोष संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, गणेशोत्सवाच्या संपूर्ण १० दिवस आणि रात्री ऐकायला मिळतो. संपूर्ण भारतात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना, महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. आज आम्ही तुम्हाला भारतभरातील १० प्रसिद्ध गणपती मंडळांची माहिती देणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गणेश चतुर्थी फक्त महाराष्ट्रातच साजरी केली जाते, असे अनेकांना वाटते; पण ते चुकीचे आहे. कारण- हा संपूर्ण भारताचा सण आहे. म्हणून भारताच्या अनेक भागांमध्ये गणेश चतुर्थी साजरी केली जाते; तर तमिळनाडू आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये याच दिवसाला ‘विनयगर चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते.
हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. हा उत्सव १० दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशी (शुक्ल पक्षाच्या १४ व्या दिवशी) गणेशमूर्तीच्या विसर्जनाने समाप्त होतो. बहुतेक लोक घरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून सण साजरा करतात; तर महाराष्ट्रात मंडळामध्ये महाकाय गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून, सार्वजनिकरीत्या हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे याला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखले जाते. तर, आता आपण भारतातील प्रसिद्ध गणपती मंडळांबाबत जाणून घेऊ.
१. लालबागचा राजा- लालबाग मुंबई.
ब्रिटिश राजवटीत पहिल्यांदा ‘लालबागचा राजा’ची स्थापना झाल्यापासून ८५ वर्षांहून अधिक काळ तो मुंबईत ‘राज्य’ करीत आहे. ‘लालबागच्या राजा’ची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली होती. कोळी समाजाच्या नवसाला पावलेला म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. मुंबईतील लालबागमध्ये जुन्या काळात मुख्यत्वे विणकर आणि इतर कामगार राहत होते. हे मंडळ मुंबईतील सर्वांत सुशोभित असलेल्या मंडळांपैकी एक आहे आणि उत्सवाच्या १० दिवसांमध्ये दररोज सरासरी १५ लाख लोक येथे दर्शनसाठी येतात. लोककथा अशी आहे की, लालबागचा राजा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो.
२. दगडूशेठ हलवाई गणपती- पुणे
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ हे भारतातील सर्वांत जुन्या सार्वजनिक मंडळांपैकी एक आहे. कारण- १८९६ पासून येथे उत्सव साजरा केला जात आहे. दगडूशेठ हलवाई हे कर्नाटकातील मिठाई व्यापारी होते; जे पुण्यात स्थायिक झाले होते. या ठिकाणी बसवलेली गणेशमूर्ती देशातील सर्वांत महागडी म्हणून ओळखली जाते. या मूर्तीचा सुमारे एक कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आल्याचे वृत्त आहे.
३. मुंबईचा राजा- गणेश गल्ली, लालबाग मुंबई.
गणेश सार्वजनिक उत्सवाच्या १० दिवसांत मुंबईतील सर्व रस्ते लालबाग येथील गणेश गल्लीकडे जातात. प्रत्येक वेळी सामाजिक संदेश देणार्या शास्त्रीय मूर्तीसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. मुंबईतील सर्वांत जुने मंडळ, असा या मंडळाचा मान आहे. १९२८ मध्ये लालबागमधील गिरणी कामगारांनी गणेश गल्ली मंडळाची स्थापना केली.
४. खैरताबाद गणेश मंडळ- हैदराबाद
हैदराबाद हे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरे करणारे आणखी एक शहर आहे. खैरताबाद गणेश मंडळ हे परंपरेने हैदराबादमधील सर्वांत मोठे गणेश मंडळ आहे. या वर्षी ही मूर्ती जवळपास १०० फूट उंच असून, त्याची किंमत एक कोटी रुपयांपर्यंत आहे. ही मूर्ती राजस्थानातून आणलेल्या मातीपासून बनवून, सेंद्रिय रंगाने रंगवली जाते.
५. कसबा गणपती- पुणे
कसबा गणपतीला शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. शिवरायांची आई जिजामाता यांनी हे मंदिर बांधले. हे गणेशाचे मंदिर असले तरी ते दरवर्षी सार्वजनिक मंडळाद्वारे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कसबा गणपती येथे केली. या मूर्तीला अनेक वर्षांपासून भारतातील सर्वोत्तम मूर्तींपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे.
६. गिरगावचा राजा– गिरगाव, मुंबई
खेतवाडी व गिरगाव ही गुजराती व मारवाडी लोकसंख्या असलेली व्यापारी क्षेत्रे आहेत. पण, हे समुदाय दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळ महाराष्ट्रीयन लोकांसोबत एकत्र येतात. हे मंडळ विशिष्ट थीमसह उभारले जाते. मूर्तींची रचना सौंदर्यपूर्ण असते. या गणेशोत्सव मंडळाला ‘गिरगावचा राजा’ होण्याचा मान हक्काने दिला जातो.
७. जीएसबी सेवा मंडळ गणपती– किंग्ज सर्कल, मुंबई
जीएसबी गणपती ही सलग अनेक वर्षांपासून भारतातील सर्वांत श्रीमंत गणेशमूर्ती आहे. दक्षिण भारतीय आणि गुजराती लोकांची वस्ती असलेल्या मुंबईतील किंग्ज सर्कल या ठिकाणी ही मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. या मंडळामध्ये दरवर्षी ६५ हजारहून अधिक लोक त्याची पूजा करतात. या सार्वजनिक गणेशमूर्तीची उत्कंठावर्धक बाब म्हणजे १० ऐवजी पाच दिवस पूजाअर्चा केली करून, उत्सवाच्या पाचव्या दिवशी विसर्जन केले जाते.
हेही वाचा – Ganesh Festival 2023 : लाडक्या बाप्पाबाबत पाच कथा; ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील
८. धरमपेठ सार्वजनिक गणेशोत्सव- नागपूर
नागपूरमध्ये जवळपास ६० वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पुणे-मुंबईसारखी मंडप व्यवस्था आणि मूर्ती तितकी मोठी नसली तरी धरमपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नागपूरमधील सर्वांत मोठे मंडळ आहे. भाविकांची येथे नेहमी गर्दी असते.
९. नाशिकचा राजा- नाशिक
महाराष्ट्रातील नाशिक हे आणखी एक औद्योगिक शहर आहे. येथे अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. जरी मंडप आणि उत्सव पुण्याइतका भव्य नसला तरी नाशिकचा राजा हे नाशिकमधील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखले जाते. घणकर लेन, अशोकस्तंभ, नाशिक येथे या मंडळाचा उत्सव साजरा होतो. उत्सवाच्या दहाव्या दिवशी विसर्जन करण्यापूर्वी १० दिवस मूर्तीची पूजा केली जाते.
१०. सार्वजनिक गणेशोत्सव- पणजीम, गोवा
गोवा हे अनेक अर्थांनी महाराष्ट्रासारखेच आहे. गोव्यात मराठी लोकसंख्या लक्षणीय आहे. तर, गणेश चतुर्थी हा गोव्यातील लोकप्रिय सण आहे. महाराष्ट्रात हे मंडळ तितके मोठे नसले तरी गोव्यात या गणेश मंडळाचा वाटा आहे. पणजीम येथील सार्वजनिक गणेशोत्सव हे एक असे उदाहरण आहे की, जिथे गणेशमूर्ती लोकांसाठी खुल्या आहेत; ज्यामध्ये १० दिवस दररोज पूजा आणि आरती केली जाते. मडगाव व म्हापसा येथेही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.
गणेशोत्सव हा भारतातील सर्वांत मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. ज्या भागात गणेशाचे मंडप आहेत, त्या भागात वाहतूक जवळपास ठप्प होते. या मंडळाच्या परिसरात १० दिवस भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यामागची प्राथमिक संकल्पना ही विविध धर्म आणि जातींतल्या लोकांमधील संबंध वाढवणे आणि एकता निर्माण करणे, अशी होती. लोकांनी आपापसांतील मतभेद दूर करून गणेश चतुर्थी एकत्रितपणे साजरी करण्याची वेळ आली आहे.