Ganesh Chaturthi 2024:दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा गणपती बाप्पाचं आगमन ७ सप्टेंबरला होतंय. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लोक आपापल्या घरी गणपती बसवतात आणि पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. गणेशाला समृद्धी आणि बुद्धीची देवता, असे मानले जाते. अशा सर्वांना प्रिय असलेल्या देवतेची गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक भाविक १० दिवस पूजा करतात; तर काही भक्त गणेशमूर्ती एक दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस बसवतात. असं म्हटलं जातं की, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती घरात ठेवून श्रद्धेनं पूजा करणाऱ्यांची सर्व संकटं गणपती बाप्पा दूर करतो. १० दिवस चालणारा हा महोत्सव संपूर्ण भारतभरात मोठ्या आनंद आणि जल्लोषात साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळतं.

गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं असताना घरोघरी आता बाप्पाच्या आगमनाची तयाची सुरू झाली आहे. कुणाकडे सजावटीची खूप जोमानं तयारी सुरू झाली असेल, तर कोणी घरगुती वस्तूंचा वापर करून, तर कोणी बाजारात मिळणारं तयार सजावट साहित्य आणत, आपल्या बाप्पाला त्यात विराजमान करण्याच्या तयारीला लागले आहेत. गणरायाच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही लगबग सुरू आहे. यंदाच्या गणपतीत काय करावं अन् काय नको, अशा द्विधा मनस्थितीतही अनेकांची तयारी सुरू आहे. परंतु, बाप्पाच्या आगमनापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. तेव्हा बाप्पाच्या आगमनापूर्वी कोणत्या चुका टाळायला हव्यात ते आपण जाणून घेऊ.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

हेही वाचा:Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेशोत्सव कधी सुरू होतोय? घरोघरी बाप्पा कधी विराजमान होणार? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी अन् शुभ मुहूर्त….

बाप्पाच्या आगमनावेळी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी…

  • गणेशमूर्ती घरी नेण्यापूर्वी घराची स्वच्छता आणि अंघोळ करून घ्या.
  • मूर्ती मातीची असावी.
  • साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना व चित्र-विचित्र आकारातील गणेशमूर्ती मुळीच घरी नेऊ नये.
  • गणपतीची मूर्ती घरी नेताना ती स्वच्छ कपड्याने झाकून न्या.
  • तुमच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करा.
  • श्रीगणेशाला दूर्वा अवश्य अर्पण करा.
  • बाप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर घर रिकामे ठेवू नका.
  • गणपतीची प्रतिष्ठापना करताना योग्य विधी आणि शुभ मुहूर्त पाळा.
  • घरामध्ये बाप्पाचे वास्तव्य असल्यास केवळ सात्त्विक अन्न शिजवावे आणि त्या अन्नाचाच नैवेद्य बाप्पाला दाखवावा.
    मूर्तीची पूजा आणि आरती केल्याशिवाय तिचे विसर्जन करू नये.

हेही वाचा – Pune Video : यंदा दगडूशेठ मंदिराच्या सजावटीसाठी साकारले आशियातील सर्वात उंच जटोली शिवमंदिर, पाहा Viral Video

‘या’ दिवसापासून गणेश महोत्सवाला होणार सुरुवात

हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०१ वाजता सुरू होत आहे आणि ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३७ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार शनिवार म्हणजे ७ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरोघरी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा-अर्चा केली जाईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)