Ganpati powerful stotram and mantras: संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. वर्षभर लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. बाप्पाच्या आगमनासाठी चविष्ट पदार्थ, सुंदर सजावट, ढोल-ताशाचा गजर या सगळ्याची जय्यत तयारी केली जाते. दररोज बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, सुंदर आरत्या म्हटल्या जातात. दूर्वा, फुले अर्पण केली जातात. पण, या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचदा अनेकांकडून बाप्पाला आवडणारी ही एक गोष्ट करायची राहून जाते. खरे तर, बाप्पाच्या आगमनामुळे घरात प्रचंड लगबग सुरू असते. त्यामुळे अनेकदा बाप्पासमोर काही वेळ शांत बसून, त्याच्या आवडच्या स्तोत्रांचे पठण आणि मंत्रांचा जप करता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाप्पाचे तीन प्रभावशाली अशी सोपी स्तोत्रे आणि दोन मंत्र सांगणार आहोत; ज्यांच्या पठणाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा