Ganesh Chaturthi 2024 गणेशोत्सवाचा कालावधी हा प्रचंड उर्जा आणि उत्साहाचा असतो. या वर्षीही गणेशाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी आपण सज्ज झाले आहोत. घराघरात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू यंदाआहे. गणेश किंवा गणपती हिंदूं धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे, इतकेच नाही तर अनेक मिथकशास्त्राचे अभ्यासक गणरायाचे वर्णन करताना ‘सीमांपलीकडचा देव’ असे करतात. सर्व जाती, धर्माच्या सीमा ओलांडून गणरायाची स्थापना आणि पूजा केली जाते. यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकसत्ता डॉट कॉम घेऊन आले आहे एक विशेष क्विझ. १० प्रश्नांची उत्तरं द्या आणि मिळवा विशेष बक्षीस!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणरायाच्याच पूजनाने केली जाते. म्हणूनच यावर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या बुद्धीच्या देवतेला स्मरून लोकसत्ता डॉट कॉमने खास तुमच्यासाठी एक आगळ-वेगळं क्विझ आणलं आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचेच लाडके दैवत आहे. म्हणूनच त्याचा पाहुणचार करण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. अजून बाप्पाचं आगमन व्हायचं आहे तरीही आत्तापासूनच आपण त्याला काय हवं, काय नको याची विशेष काळजी घेत आहोत. अगदी बाप्पाची आरास करण्यापासून ते बाप्पाला नेवैद्य काय द्यावा इथपर्यंत आपलं नियोजनही करून झालं आहे. बाप्पाचे कुटुंबीय, त्याच्या आवडत्या बाबी आदी माहितीवर आधारित क्विझ लोकसत्ता घेऊन आलं आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणा आणि सुरुवात करा… क्विझ सोडावा आणि आपल्या बुद्धीची चमक दाखवा !

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2024 how much do you know about your beloved ganapati bappa answer these questions and win prizes svs