Wheat Flour Modak: बाप्पाच्या प्रसादासाठी विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. त्यात तांदळाच्या उकडीचे मोदक घरोघरी आवर्जून बनवले जातात. पण, अनेकांना तांदळाच्या उकडीचे मोदक बनवता येत नाहीत. अशा वेळी तुम्ही गव्हाच्या उकडीचे सोपे आणि झटपट होणारे मोदक नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग पटकन नोट करा साहित्य आणि कृती…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गव्हाच्या कणकेचे मोदक बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी गव्हाचे पीठ
  • नारळ (आवश्यकतेनुसार)
  • १/२ वाटी गूळ
  • १ चमचा वेलची पूड
  • चवीनुसार मीठ

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2024: फक्त १० मिनिटांत झटपट बनवा बिस्किटांचे मोदक; नोट करा साहित्य आणि कृती

गव्हाच्या कणकेचे मोदक बनविण्याची कृती:

  • सर्वप्रथम गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून पोळ्यांसाठी मळतो तशी कणीक मळून घ्या.
  • तोपर्यंत दुसरीकडे नारळ फोडून खोबरे बारीक किसून घ्या आणि गरम कढईत तूप घालून त्यात घाला.
  • काही वेळ परतल्यानंतर त्यात गूळ बारीक करून घाला.
  • गूळ आणि खोबरे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात वेलची पूड घाला.
  • आता गव्हाच्या कणकेच्या बारीक पुऱ्या लाटून, त्यात सारण भरून त्याचे मोदक तयार करा.
  • आता हे तयार मोदक तुम्ही उकडून घ्या.
  • गरमागरम गव्हाच्या मोदकांचा बाप्पाला नैवेद्य दाखवा.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 24 make tasty wheat flour modak note recipe and ingredients sap