Ganesh Chaturthi 2024 Modak Recipe For Bappa :आपल्या लाडक्या बाप्पाचे उद्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी आगमन होईल. गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे गोड-गोड मोदक. मोदक करायचे मग ते उकडलेले किंवा तळलेले करायचे असंच आपल्या डोक्यात पहिला येतं. मग यंदा काहीतरी वेगळं करून पाहिलं तर. हा मोदक तुम्ही साच्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज बनवू शकता. यात तुम्हाला सारण सुद्धा भरावं लागणार नाही. तर आज आपण माव्याचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत. चला तर पाहुयात माव्याचे मोदक (Modak Recipe) बनवण्याची सोपी कृती…

साहित्य :

१. मावा
२. पिठी साखर
३. मिल्क पावडर
४. जायफळ
५. वेलची
६. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स
७. मोदक बनवण्याचा साचा

Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Bread Pizza Toast Recipe
नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी
Crispy Corn Recipe easy corn recipe for snacks
Crispy Corn Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? अवघ्या १० मिनिटांत बनवा मक्याची ‘ही’ रेसिपी

कृती :

१. सर्वप्रथम मावा तुपात परतवून घ्या.
२. नंतर एका प्लेटमध्ये काढून तो थंड करण्यास ठेवून द्या.
३. नंतर त्यात त्यात पिठी साखर, मिल्क पावडर, घाला.
४. त्यानंतर त्यात वेलची, जायफळ टाका.
५. मिश्रण थोडं थंड झाल्यावर साच्यातून मोदक बनवून घ्या.
६. मोदक करताना साच्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स सुद्धा घाला.
७. तर अशाप्रकारे तुमचे माव्याचे मोदक तयार.

हेही वाचा…Ganeshotsav 2024 : यंदा बाप्पासाठी बनवा ‘रसमलाई मोदक’; VIDEO तून पाहा सोप्पी पद्धत; रेसिपी लिहून घ्या पटकन

असेच तुम्ही ‘बेसनचे मोदक’ (Modak Recipe) सुद्धा बनवू शकता.

साहित्य :

१. तुप
२. बेसन
३. दुधावरची साय
४. पिठी साखर
५. जायफळ
६. वेलची
७. मोदक बनवण्यासाठी साचा
८. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स

कृती :

१. सगळ्यात पहिला तुपात बेसन परतवून घ्यावे लागेल.
२. नंतर त्यात थोडी दुधावरची साय टाका.
३. त्यानंतर त्यात पिठी साखर, वेलची, जायफळ टाका.
४. मिश्रण थोडं थंड झाल्यावर साच्यातून मोदक बनवून घ्या.
५. मोदक करताना आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाका.

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. बाप्पांच्या आगमनासाठी सर्व जण उत्सूक आहेत. अशात बाप्पांचे आवडते चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी तुम्हीही खूप उत्सूक असाल. गणपतीला सर्वात जास्त मोदक (Modak Recipe) आवडतात.तर अशाप्रकारे तुम्ही बाप्पाच्या पुढ्यात दोन प्रकारचे म्हणजेच मावा आणि बेसनचे गोड-गोड मोदक नैवेद्य म्हणून ठेवू शकता किंवा घरात आलेल्या पाहुणे मंडळींना प्रसाद म्हणून सुद्धा देऊ शकता.

Story img Loader