Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs : उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होईल आणि घरोघरी बाप्पाचं आगमन होणार. गणपती उत्सव हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अगदी १५ ते २० दिवस आधीच आपण सगळेच या सणाची तयारी करण्यास सुरुवात करतो. या दिवसांमध्ये सकाळी उठल्यावर दारात रांगोळी काढण्यापासून ते अगदी घर सजवण्यापर्यंत आपण अनेक गोष्टी करण्यास उत्सुक असतो. तर तुमच्याही घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे का? मग दररोज कोणती रांगोळी काढायची हे तुम्ही ठरवलं आहे का? नाही… तर तुमच्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाईन (Rangoli Designs) आम्ही घेऊन आलो आहोत ; ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

बाप्पाच्या स्वागतासाठी काढा ‘या’ सोप्या पाच रांगोळ्या

१. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे फक्त दोन पट्ट्यांच्या सहाय्याने तुम्ही गणपती बाप्पा असा मजकूर लिहून अगदी आकर्षक रांगोळी काढू शकता.

२. मधोमध स्वस्तिक आणि त्याच्या भोवती पाने, फुले किंवा आणखी तुमच्या आवडीच्या डिझाईन काढून तुम्ही अगदी साधी रांगोळी देखील काढू शकता.

३. शिवलिंग आणि गणपती बाप्पाचे असे सुंदर चित्र रेखाटून तुम्ही अगदी सोपी फोटोत दाखवल्याप्रमाणे रांगोळी काढू शकता.

हेही वाचा…Modak Recipe : फक्त १५ ते २० मिनिटांत बाप्पासाठी करा मोदक; तोंडात टाकताच विरघळतील; रेसिपी पटकन लिहून घ्या

४. गौरी आवाहनला तुम्हाला अगदी सोपी, क्रिएटिव्ह रांगोळी काढायची असेल तर तुम्ही पुढील रांगोळीचा विचार करू शकता. यामध्ये नथ, हळदी कुंकू, लक्ष्मीची पाऊले, मंगळसूत्र यांचा समावेश आहे.

५. गौरी पूजनला तुम्ही खाली दिल्या प्रमाणे तांदूळ, हळद, कुंकूच्या सहाय्याने सुंदर, सोपी रांगोळी काढू शकता.

६. गणपती बाप्पाला अनेक हार घातले जातात. तर दुसऱ्या दिवशी ही फुले कोमेजून जातात. त्यामुळे आपण ही फुले सहसा टाकून देतो. तर असं न करता तुम्ही घराच्या उंबरठ्यावर फुलांच्या पाकळ्यांनी तुमच्या आवडीची रांगोळी डिझाईन काढून शकता.

सोशल मीडियाच्या @rangolidesignsideas @rangolibysakshi @shikhacreation @jayashrirangoliart या इन्स्टाग्राम युजर्सच्या अकाउंटवरून हे फोटो व व्हिडीओ घेण्यात आले आहेत. तुम्हीसुद्धा या रांगोळी डिझाईन (Rangoli Designs) आवडल्या तर नक्की काढा आणि तुमच्या बाप्पाच्या आगमची जय्यत तयारी करा…