Gauri Pujan Ukhane 2024 : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनानंतर वेध लागलेत ते गौराईच्या आगमनाचे. गौराईच्या रूपात घरोघरी पार्वतीमातेचे भक्त उत्साहात आनंदाने स्वागत करतात. गौराई म्हणजे गणपती बाप्पाची आई. ती माहेरवाशीण म्हणून येत असल्याने तिचे घरात आनंदाने स्वागत केले जाते. तिच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. भाद्रपद शुल्क अष्टमी तिथीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. यंदा मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल. पण, गौराईच्या पूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे यंदा ११ सप्टेंबरला नववधू, तसेच विवाहित महिला पारंपरिक पद्धतीने नटून- थटून गौराईचा ओवसा भरतील, प्रत्येक ठिकाणी ओवसा भरण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
पण ओवसा भरुन गौराईची पूजा केल्यानंतर नवविवाहित महिलांना उखाणा (Gauri Pujan Marathi Ukhane For Bride) घेण्यासाठी खास आग्रह धरला जातो. मग ऐन वेळी कोणता उखाणा घ्यायचा, असा प्रश्न त्यांना पडतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी असे काही साधे सोपे उखाणे घेऊन आलोत, जे तुम्हाला सहजपणे लक्षात ठेवायला सोपे जाईल. चला तर मग गौरी पूजनानिमित्त आपण खास उखाण्यांची यादी पाहू…
Read More Story On Gauri Pujan : गणेशोत्सवात माहेरवाशीण गौरीचा ओवसा कसा भरतात? काय आहे ही परंपरा? जाणून घ्या
गौरी पूजनाकरता महिलांसाठी खास १० उखाणे (Gauri Pujan Special 10 Marathi Ukhane)
१) गौरी-गणपतीसमोर ठेवल्या पंचपक्वान्नाच्या राशी, …… रावांचे नाव घेते, गौरीपूजनाच्या दिवशी.
२) भरजरी साडीला साजेसा जरतारी खण, …… रावांचे नाव घेते, आज आहे गौरीपूजनाचा सण.
३) जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण …रावांचे नाव घेते, ज्येष्ठा गौरीपूजनाचे कारण.
४) मोत्यांची माळ, सोन्याचा साज…. रावांचे नाव घेते, गौरी पूजनाचा सण आहे खास.
५) सासरे आहेत छान, सासू आहे हौशी…. रावांचे नाव घेते गौरीपूजनाच्या दिवशी.
६) सोळा दिव्यांनी केली गौराईची आरती … राव आहेत माझ्या संसाराचे सारथी.
७) सृष्टीसौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी….. रावांचे नाव घेते गौरीपूजनाच्या वेळी.
८) गौरीमाते पायी मस्तक ठेऊनी नमन करते तुला … रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला
९) भाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे….. रावांचे नाव घेते गौराईच्या पुढे
१०) यमुनेच्या काठी रमतो राधा-कृष्णाचा खेळ…….रावांचे नाव घेते, आली गौराईच्या पूजनाची वेळ
गौराईच्या पूजेनिमित्त तुम्ही हे खास उखाणे पाठ करून स्मरणात ठेवू शकता. तसेच तुमच्या विवाहित मैत्रिणींनादेखील उखाण्यांची ही यादी पाठवू शकता.