लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत; पण मुंबईत वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात अनेक मंडळांनी गणेश आगमन सोहळ्याला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांनी गणपतीच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पण, या वर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळेवेगळे करण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मुंबईत गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झालीय, असे म्हणायला हरकत नाही. उंच गणेशमूर्ती आणि भव्य-दिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र असते. तसेच मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो. मुंबईतील अशी अनेक प्रसिद्ध गणेश मंडळे आहेत; जे कित्येक वर्षांपासून गणेशोत्सवाची ही परंपरा आनंदाने साजरी करीत आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपण मुंबईतील सात लोकप्रिय आणि मानाच्या गणपतींबद्दल जाणून घेणार आहोत. (Ganpati Festival 2023)

मुंबईतील सात मानाचे आणि प्रसिद्ध गणपती (Popular Ganesh Mandal of Mumbai)

१) मुंबईचा राजा

Gen Beta
Gen Beta (2025-2039):आजपासून आठ दिवसांनी होणार ‘Gen Beta’ चा जन्म; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Year Ender Best AI Advancements 2024
Top AI Developments 2024 : २०२४ मध्ये AI मध्ये कोणते पाच मोठे बदल दिसून आले?
Top 5 Gadgets Launched in 2024 in Marathi Best New Gadgets 2024
Year Ender 2024: चर्चा तर होणारच! ‘या’ हटके गॅजेट्सने गाजवले २०२४ वर्ष; पाहा टॉप ५ गॅजेट्स
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण

मुंबईचा राजा, अशी ख्याती असलेल्या लालबागमधील गणेश गल्लीतील गणरायाची यंदाची मूर्ती आणि सजावट अधिक आकर्षक असणार आहे. मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-परळमधील कष्टकरी गिरणी कामगारांनी १९२८ साली गणेश गल्लीत गणपती बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७७ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली मंडळाने २२ फूट उंच गणेशमूर्ती बसवली होती. तेव्हापासून आजपर्यंत हे मंडळ एकापेक्षा एक आकर्षक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करीत आहे. यंदा हे मंडळ ९६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, दरवर्षी गणेश गल्लीतील गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूरवरून येत असतात.

२) लालबागचा राजा

नवसाला पावणारा बाप्पा, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची जगभरात ख्याती आहे. या राजाच्या दर्शनसाठी देशभरातून भक्तांची रांग लागते. सन १९३१ साली लालबागच्या पेरू चाळीतील बाजारपेठ बंद झाली. यावेळी तेथील स्थानिक मच्छीमारांनी आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाल्यास गणपती बसवू, असा नवस केला. त्यानुसार १३ सप्टेंबर १९३४ रोजी सध्याच्या लालबाग मार्केटमध्ये गणपती बसवण्यास सुरुवात झाली; जी परंपरा आजही सुरू आहे. विशेष म्हणजे लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान असतो, त्याच ठिकाणी बाप्पाची मूर्ती साकारली जाते. पण, त्याआधी पाद्यपूजन सोहळा पार पडतो. त्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात होते.

३) चिंचपोकळीचा चिंतामणी

चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती त्याच्या आगमन सोहळ्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. हा मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दोन महिने आधीपासूनच त्याची तयारी सुरू होते. चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ १९२० मध्ये स्थापन झाले. हे मुंबईतील दुसरे सर्वांत जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. तसेच हे अनेक सामाजिक उपक्रमांसाठीही ओळखले जाते. यंदाचे हे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे १०४ वे वर्ष आहे.

४) तेजुकाया मेन्शन गणपती

लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणी अशा प्रसिद्ध गणेशमूर्ती पाहिल्यानंतर अनेक गणेशभक्त मुंबईतील आणखी एक मानाचे व प्रसिद्ध गणेश मंडळ तेजुकाया मेन्शनची गणेशमूर्ती पाहण्यासाठी जातात. १९४७ साली या मंडळाची सुरुवात झाली. हत्तीसारखे गंडस्थळ, सुपाएवढे कान व लंबोदर, अशी २१ फूट उंचीची गणेशमूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. या मंडळाकडून पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जाते. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती दोन कोटींपेक्षा जास्त सोन्याच्या दागिन्यांनी नटलेली असते. त्यामुळेच तेजुकाया मंडळाच्या वतीने साकारल्या जाणाऱ्या देखाव्यासोबतच मूर्ती पाहण्याचे सर्वांना आकर्षण असते.

५) जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल

माटुंगा येथील जीएसबी सेवा गणेश मंडळाचा गणपतीही मुंबईतील मानाची आणि सर्वांत धनाढ्य गणपती म्हणून ओळखला जातो. कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने १९५५ मध्ये या गणपतीची स्थापना केली, गेली कित्येक वर्षे हे मंडळ आपली परंपरा कायम राखून आहे. जीएसबी मंडळाच्या गणेश मूर्तीला शुद्ध सोन्याची आभूषणे घातली जातात. गणपतीचे अनेक अवयवही सोने-चांदीच्या दागिन्यांनी बनवलेले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी मढवलेला हा गणपती असतो.

६) केशवजी नाईक चाळ, गिरगाव

मुंबईतील सर्वांत जुन्या गणेश मंडळांपैकी सर्वांत पहिले मंडळ म्हणून गिरगावमधील केशवजी नाईक चाळीचा गणपती मंडळाकडे पाहिले जाते. आजही अत्यंत पारंपरिक आणि साधेपणाने या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे पालखीतूनच गणपतीचे आगमन होते आणि विसर्जनासाठीही पालखीच वापरली जाते. त्यामुळे हे मंडळ आपल्या पर्यावरणानुकुल उत्सवाशी आणि लहान गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हा गणपती म्हणजे राजकीय आणि सामाजिक चळवळींसाठी हक्काचे व्यासपीठ होते. या मंडळाला आता १३० हून अधिक वर्षे झाली आहेत. पण, तरीही त्यांनी आपली परंपरा जपून ठेवली आहे.

७) परळचा राजा (नरे पार्क)

परळचा राजा हादेखील मुंबईतील एक मानाचा गणपती मानला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी म्हणजे १९४७ साली या मंडळाची प्रतिष्ठापना झाली. या गणपतीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा या नावाने ओखळले जाते. परळच्या राजाला भेट देण्यासाठी असंख्य भाविक दरवर्षी येत असतात. यंदा या मंडळाला ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे तुम्ही यंदा मुंबईतील प्रसिद्ध मंडळांना भेट देण्याचा विचार करीत असाल, तर वरील सात प्रसिद्ध आणि मानाच्या गणपतींना नक्की भेट द्या.

Story img Loader