Ganesha Festival 2024: आता भक्तांची आतुरता संपली आहे. अखेर लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वेळ आली आहे. घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीला सुरवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले जात आहे. पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन झाले आहे. लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी पुणेकर उत्सुकता झाले आहेत.
ढोल-ताशाच्या गजरात श्रींमत दगडूशेठ गणपतीचे स्वागत (Shrimant Dagdusheth Ganpati is Welcomed with Drumbeats)
दगडूशेठ गणपतीच्या स्वागतासाठी विविध ढोल-पथकांनी वादन सुरु आहे. ध्वज उंचावून बाप्पाला मानवंदना देण्यात येत आहे. दगडूशेठ मंदिराच्या परिसर ‘मोरया मोरया’च्या जयघोषाने दुमदुमला आहे. दगडूशेठ गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.
हेही वाचा – गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या..
सिंह रथातून निघाली श्रींमत दगडूशेठ गणपती मिरवणूक (Lion Chariot Shrimant Dagdusheth Ganpati Procession)
यंदा सिंह रथामधून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघाली आहे. सिंह रथाला फुलांची सुंदर आरास केली आहे.त्यानंतर जटोली शिव मंदिराता दगडशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.
हेही वाचा – भक्तांनो, लाडक्या बाप्पाची आरती म्हणताना तुम्ही ‘या’ चुका करू नका!
हेही वाचा –गणपतीला प्रिय आहेत ‘या’ ३ राशी! जाणून घ्या कोणत्या राशींवर असते बाप्पाची विशेष कृपा?
हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिरात श्रीमंत दगडूशेठ गणपती होणार विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र मंदिराची तेजस्वी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जटोली शिवमंदिराची प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब,५० फूट रंद आणि १११ फूट उंच आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात आले आहे.