Ganesha art drawing: सध्या देशभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांत बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना सजावट, रांगोळी, गणपतीचं सुरेख चित्र किंवा मातीची मूर्ती अशा अनेक कला सादर करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता असाच एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. त्यात एका कलाकारानं अवघ्या काही सेकंदांतच १६ ठिपक्यांनी गणपतीचं सुरेख चित्र रेखाटलं आहे. अगदी काही वेळातच तुम्हीही हे चित्र रेखाटू शकता. १६ ठिपके काढल्यानंतर आधी आऊटलाईन काढून, मग त्यात या गुणी कलाकारानं अधिक बारकावांचा समावेश केला आहे.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

हेही वाचा… “सूनबाईचे ३,००० रुपये आले”, ‘लाडकी बहीण’चे पैसे आल्यावर सासू-सुनेने केला जबरदस्त डान्स; VIDEO VIRAL

@ashish_m_pandey या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, आशिष पांडे असे या अवलिया कलाकाराचं नाव आहे. ‘१६ बिंदुओं से गणेश जी’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला १.५ मिलियन व्ह्युज आले आहेत आणि ३४,३०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. आशिष यांनी आधीही असे अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ शेअर केले आहेत, जे तुफान व्हायरल झाले होते.

हेही वाचा… दिव्यांग भक्ताने पायाने रेखाटलं ‘लालबागच्या राजा’चं चित्र, VIDEO पाहून कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओवर युजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “भावा, तू खूप सुंदर चित्र रेखाटलं आहेस.” तर दुसऱ्यानं, “अति सुंदर”, अशी कमेंट केली. तर अनेकांनी “जय श्री गणेश”, “गणपती बाप्पा मोरया” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा… Optical Illusion: या वर्तुळात दोन अंकी आकडा लपलाय! ७ सेकंदात शोधू शकाल का? यावरून कळेल की…

दरम्यान, गणेशोत्सवाच्या या भक्तीमय वातावरणात सध्या सोशल मीडियावर यासंबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक कलाकार आपल्या कलेचं प्रदर्शन करून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवतायत.