गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण गणेशोत्सवासाठी आतुर असतात. भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते पण यावर्षी प्राणप्रतिष्ठेच्या तारखेवरुन गोंधळ दिसून येत आहे. यंदा श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करायची कधी? १८ की १९ सप्टेंबर? याविषयी पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सविस्तर माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणवारांच्या तारखांमध्ये गोंधळ का होतो?

पंचांगकर्ते गौरव देशपांडे सांगतात, “भारतात पंचांगासाठी दोन पद्धतींचा उपयोग केला जातो. त्यातील पहिल्या पद्धतीला सूर्यसिद्धांत पद्धती म्हटले जाते. तर दुसरी पद्धत ही नासाच्या एफीमेरीजवर आधारित आहे. १९५० पासून नासाकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिथी काढत असल्याने अनेकदा तारखांमध्ये गोंधळ निर्माण होतो. यावर्षीही गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवरुन हा गोंधळ दिसून आला. या पद्धतीमुळे महाराष्ट्रात अनेक सणवार चुकीच्या दिवशी साजरे होतात”

हेही वाचा : श्रीकृष्णाकडून शिका ‘या’ पाच गोष्टी; जाणून घ्या आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र

श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा कधी करायची?

पंचांगकर्ते गौरव देशपांडे पुढे सांगतात, ” प्राचीन सूर्यसिद्धांताच्या पद्धतीनुसार यावर्षी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही १९ नव्हे तर १८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी करावी”
याविषयी सविस्तर माहिती देताना त्यांनी श्रृंगेरी शंकराचार्य पिठाचे पंचांगचा उल्लेख केला आहे. पंचांगकर्ते देशपांडे सांगतात, “१५० वर्षे जुने असलेले मदन मोहन मालवीय पुरस्कृत व बनारस हिंदू विद्यालय यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात येणारे विश्व पंचांग आणि वैष्णवांचे मंत्रालय, उत्तराधी मठ, इत्यादी प्रमुख पंचांग पाहिली तर गणेश चतुर्थी ही १८ सप्टेंबर रोजी आहे. मग केवळ महाराष्ट्रातच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी १९ सप्टेंबर ही तारीख का देण्यात आली आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे.”

श्रीगणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त

पंचांगकर्ते देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे, १८ सप्टेंबर चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय ते दुपारी २ पर्यंत तुम्ही केव्हाही श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. सूर्योदय ते दुपारी २ पर्यंत प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesha chaturthi sthapana day 18 september or 19 september panchang on confusion over the date ganesh utsav 2023 ndj