साहित्य : सीडलेस खजूर १०० ग्रॅम, गव्हाचं पीठ १ वाटी, साजूक तूप ४ चमचे, रोज वॉटर १/४ कप, वेलची पावडर १ चमचा, जायफळ पावडर १/२ चमचा, बदाम २, अक्रोड २ .
कृती : पॅनमध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्या. बारीक गॅसवर सावकाश भाजताना, थोडं थोडं तूप घाला. गोल्डन ब्राऊन कलर येऊन सुवास येईपर्यंत भाजा. थोडं थोडं रोज वॉटर घालून ढवळत राहा. खजूर अगदी बारीक कापून, कुस्करून घाला. व्यवस्थित ढवला, गुठळ्या होऊ देऊ नका. वेलची पूड, जायफळ पूड घाला. बदाम आणि अक्रोडाचे बारीक तुकडे घाला. घट्ट होई पर्यंत ढवळत राहा. गॅसवरून उतरवून गार करून घ्या. अॅल्युमिनिअमच्या फॉईलमध्ये गुंडाळून रोल करा. २-३ तास फ्रिजमध्ये ठेवा. बाहेर काढून रोल कापून सर्व्ह करा.
खजुराचा गोडवा खरं तर पुरेसा असतो, जास्ती गोड हवं असल्यास १/२ वाटी गूळ वापरू शकता. ही खिरापत मधुमेह असणाऱ्यांसाठी तसेच लहान मुलांसाठीही अतिशय चांगली असते.
सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ